शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींच्या साक्षीने होणार युतीची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 19:09 IST

दीर्घकाळाच्या मैत्रीनंतर आलेला दुरावा, अनेक वादविवाद आणि ताणतणावानंतर शिवसेना आणि  भाजपामधील युतीची नव्याने घोषणा होण्याची घटिका जवळ आली आहे.

ठळक मुद्देदीर्घकाळाच्या मैत्रीनंतर आलेला दुरावा, अनेक वादविवाद आणि ताणतणावानंतर शिवसेना आणि  भाजपामधील युतीची नव्याने घोषणा होण्याची घटिका जवळ आली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संयुक्त पत्रकार परिषदेमधून युतीची घोषणा करणार आहेत

मुंबई - दीर्घकाळाच्या मैत्रीनंतर आलेला दुरावा, अनेक वादविवाद आणि ताणतणावानंतर शिवसेना आणि  भाजपामधील युतीची नव्याने घोषणा होण्याची घटिका जवळ आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आता भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संयुक्त पत्रकार परिषदेमधून युतीची घोषणा करणार आहेत. दरम्यान, युतीच्या घोषणेला भावनिक रंग देण्यासाठी दोन्ही पक्षांकडून खास तयारी करण्यात आली आहे. वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये शिवसेना आणि भाजपा नेतृत्वाची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून, संयुक्त पत्रकार परिषदेच्या आयोजनस्थळी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे पुतळे आणि प्रतिमा लावण्यात आल्या असून, आसपासच्या भागाला भगवा रंग देण्यात आला आहे. त्यामुळे भगव्यासाठी, हिंदुत्वासाठी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींच्या साक्षीने शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीची घोषणा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून होणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. 

लोकसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आघाडीचं जागावाटप ठरलं असतानाच  शिवसेना-भाजपा युतीहोण्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. लोकसभेच्या भाजपा 25 जागा लढणार असून, शिवसेना 23 जागा लढण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागा लढवणार असल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपा पालघरची जागाही शिवसेनेला देण्यास तयार झाली आहे.   लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्यावर शिवसेना आणि भाजपात एकमत झाले असून, सोमवारी भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्याची घोषणा करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण