शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Ambadas Danve : "लाखोंचा जनसमुदाय येणार असल्याची वल्गना कुठे गेली?"; ठाकरे गटाने शेअर केला 'तो' Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 15:42 IST

Ambadas Danve And Abdul Sattar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोमवारच्या सभेवरुन टीकास्त्र सोडलं आहे.

सिल्लोडमध्ये सोमवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन व त्यानंतर नगर परिषद प्रशालेच्या मैदानावर जाहीर सभा झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा सिल्लोड येथे भव्य सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. त्याच पद्धतीने खा. श्रीकांत शिंदे यांच्या सभेसाठी पदाधिकारी- कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून सभेसाठी प्रचंड संख्येने उपस्थिती असेल, असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले होते. याच दरम्यान आता सभेवरून ठाकरे गटाने सत्तारांवर जोरदार निशाणा साधला आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सोमवारच्या सभेवरुन टीकास्त्र सोडलं आहे. सभेचा एक व्हिडीओ शेअर करत हल्लाबोल केला आहे. सभेला गर्दी नसल्याने खुर्च्या उचलण्याची वेळ आली असा खोचक टोलाही लगावला आहे. अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "लाखोंचा जनसमुदाय येणार असल्याची वल्गना कुठे गेली?" असा सवालही विचारला आहे. 

"मैदान भरले नाही म्हणून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे चालू भाषणात खुर्च्या उचलण्याची वेळ काल रात्री आली. लाखोंचा जनसमुदाय येणार असल्याची वल्गना कुठे गेली? लोकांना भाषण आवडलं नसेल कदाचित..." असं म्हणत अंबादास दानवे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सभेत भाषण सुरू असतानाच रिकाम्या खुर्च्या उचलण्याचं काम सुरू करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAmbadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण