शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Shivsena Alliance-Sambhaji Brigade: 'संघाची विचारधारा भाजपला मान्य आहे का?' उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 13:43 IST

Shivsena Alliance-Sambhaji Brigade: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संभाजी ब्रिगेडशी युती करण्याची घोषणा केली आहे.

Shivsena Alliance-Sambhaji Brigade: आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती करण्याची घोषणा केली आहे. या अनपेक्षित युतीमुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. आज उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

नवीन युतीची घोषणायावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी आज शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या नवीन युतीची घोषणा करत आहे. शिवसेना संभाजी ब्रिगेडच्या लढवय्या कार्यकर्त्यांचे स्वागत करते. देशात प्रादेशिक अस्मिता मारून टाकण्याचे काम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयावर आमचा लढा सुरु आहे, हा जो निकाल लागेल त्यावर शिवसेनेचे भविष्यच नव्हे तर देशात लोकशाही राहिल की नाही हे ठरविणारा निकाल असणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेशी संबंधीत नाहीत त्या व्यक्ती संविधान वाचविण्यासाठी एकत्र येऊया असे सांगत आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आपलं रक्त एकच...उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, संभाजी ब्रिगेडची विचारधारा शिवसेनेपेक्षा वेगळी आहे, त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'आज आम्ही ज्या विचाराने सोबत आलो आहोत, तो विचार म्हणजे संविधान वाचवण्यासाठीचा विचार आहे. आपण शिवप्रेमी आहोत, आपल रक्त एकच आहे. एकत्र येऊन आपल्याला नवीन इतिहास घडवायचा आहे. दुहीच्या साप आमचा विश्वासघात करत आलाय, त्याला गाडू,' असंही ते म्हणाले.

भाजपला संघाची विचारधारा...उद्धव ठाकरे पुढे म्हणतात की, 'आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत युती केली होती. भाजपचा पितृपक्ष असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक विचार आहे, पण त्या संघाचाच विचार भाजप मानत नाही. संघाची विचारसरणी भाजपला मान्य आहे का? त्याप्रमाणे वागत आहेत का?? मोहन भागवतांनी गेल्या काही वर्षात जी मते मांडली आहेत, त्याप्रमाणे भाजप काम करत आहे का, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे विचारधारा वगैरे आम्हाला विचारण्याऐवजी त्यांना विचारावी,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड