शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Aaditya Thackeray : "कसाबच्या वेळीही इतका बंदोबस्त नव्हता, एवढी भीती कशाला? कोणी पळणार आहे का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 11:41 IST

Shivsena Aaditya Thackeray : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई - विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. भाजपाकडूनराहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या राजन साळवी हे दोन उमेदवार अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक देखील विधान  परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याच दरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "कसाबच्या वेळीही इतका बंदोबस्त नव्हता, एवढी भीती कशाला? कोणी पळणार आहे का?" असा खोचक सवाल विचारला आहे. 

आदित्य ठाकरे यांनी "इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कसाबच्या वेळीदेखील इतका बंदोबस्त लावण्यात आला नव्हता. बसमधून आणलेल्या आमदारांचं मला वाईट वाटतं, कसाबलाही असं आणलं नसेल. कोणी पळणार आहे का? एवढा बंदोबस्त कशासाठी?" अशी विचारणा केली आहे. तसेच एवढा बंदोबस्त हा पहिल्यांदा आहे. आमदारांमध्ये आणि मीडियामध्ये कधी दोरी लावण्यात आली नव्हती. एवढी भीती कशाला? कार्यालय आम्हीच सील केलं आहे. त्याची चावी आमच्याकडेच आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. 

"शिवसेनेचंच व्हीप अधिकृत आहे" असंही आदित्य यांनी सांगितलं. "आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका. आम्हाला धोका दिला ठीक आहे, पण मुंबईकरांना धोका देऊ नका. आरेचं जंगल मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आरेला देखील दोन पर्याय आहेत, एक कांजूरमार्ग आणि दुसरा पहाडी गोरेगाव. मुंबईकरांचा, आमच्या सर्वांचा विचार करणं गरजेचं आहे" असं देखील आरे कारशेडचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. तसेच ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदार यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबई