शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जय शिवाजी... दुर्मिळ अन् ऐतिहासिक शिवकालीन 'होन'च्या साक्षीने साजरा होणारा यंदाचा राज्याभिषेक सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 10:16 IST

या वर्षीप्रमाणेच गेल्या वर्षीही शिवराज्याभिषेक दिनावेळी राज्यात कोरोनाचे संकट होते. कोरोना संकट काळात पार पडणारा हा दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा असेल. (Shivrajyabhishek sohala 2021)

 मुंबई - रायगडावर दरवर्षी 6 जूनरोजी पार पडणारा शिवराज्याभिषेक सोहळा यावर्षी काहीसा विशेष आणि ऐतिहासिक ठरणार आहे. कारण यावेळचा शिवराज्याभिषेक सोहळा शिवकालीन होनांच्या साक्षिने पार पडणार आहे, अशी माहिती युवराज संभाजी छत्रपती यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्टदेखील केली आहे. (Shivrajyabhishek sohala 2021 This time the chhatrapati shivaji maharaj coronation ceremony will be historic)

राज्यात ६ जून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार,हसन मुश्रीफ यांची माहीती

संभाजी छत्रपती यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, "यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन 'होन'च्या साक्षीने साजरा होणार. स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक असणारा 'होन' हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे; राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या ऐतिहासिक 'होन'च्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार."

या वर्षीप्रमाणेच गेल्या वर्षीही शिवराज्याभिषेक दिनावेळी राज्यावर कोरोनाचे संकट होते. कोरोना संकट काळात पार पडणारा हा दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा असेल.

 

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ५१ गडांवर 'असा' साजरा होणार 'शिवराज्याभिषेक दिन'

मिळेल त्या वाहनाने राज्याभिषेक दिनी 6 जूनला रायगडावर या -सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर, खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे 5 महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदनही दिले होते. एवढेच नाही, तर 6 जूनपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही, तर रायगडावरूनच घोषणा होईल, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. यानंतर नाशिकमध्ये बोलताना, मिळेल त्या वाहनाने राज्याभिषेक सोहळ्यादिवशी 6 जूनला रायगडावर या, असे आवाहनही संभाजीराजेंनी मराठा बांधवांना केले होते. सध्या कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदीचा नियम लागू आहे. मात्र, मिळेल त्या वाहनाने रायगडावर या, असे आवाहन संभाजीराजेंनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना केले.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती