शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

शिवप्रेमी साबीरभाई

By admin | Published: October 16, 2014 11:04 PM

साबीर शेख ऊर्फ साबीरभाई यांचे निधन मनाला चटका लावणारे असले तरी आकस्मिक असे म्हणता येणार नाही.

साबीर शेख ऊर्फ साबीरभाई यांचे निधन मनाला चटका लावणारे असले तरी आकस्मिक असे म्हणता येणार नाही. वयाची 72 वर्षे ओलांडली असली तरी पन्नाशीनंतर ते मधुमेह, रक्तदाब, संधिवात अशा काही व्याधींनी त्रस्त होते. संधिवातामुळे त्यांना चालणोही कठीण झाले होते. केवळ कल्याणच नव्हे तर अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, डोंबिवलीसह ठाणो जिल्ह्यातील अनेक गावांतील, खेडय़ांतील कार्यकत्र्याच्या थेट स्वयंपाकघरार्पयत ते पोहोचले होते. कार्यकत्र्याना ते शेवटर्पयत नावाने ओळखत. साबीरभाईंचे संपूर्ण घराणो तसे भाविक, श्रद्धाळू होते. भजने, कीर्तने, भारूड, भक्तिगीते, समरगीते, पोवाडे याबरोबरच गझल, शेरशायरी यावरही त्यांचे  चांगले प्रभुत्व होते, अभ्यास होता. वारकरी संप्रदायाबद्दल त्यांना नितांत आदर होता.
साबीरभाई मूळचे नारायणगावचे असले तरी ते मुंबईत आले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या संपर्कात येताच त्यांच्या आयुष्याने वेगळीच कलाटणी घेतली़ अंबरनाथच्या आयुध उत्पादन करणा:या कारखान्यात काम करतानाच कामगार चळवळीशी त्यांचा संबंध आला. त्याच वेळी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आले. व्यायामाची आवड असलेले पहिलवान, गड-किल्लेभ्रमणाची आवड जोपासणारे शिवशाहीर साबीर शेख यांनी अनेक तरुणांना बरोबर घेऊन त्यांच्यात गिरीभ्रमणाची आवड निर्माण केली. याबरोबरच जिल्ह्यात अत्यंत निष्ठवान शिवसेना कार्यकत्र्याची फौज निर्माण केली़ स्थानिक प्रश्नावर झालेल्या आंदोलनांत त्याचा महत्त्वाचा सहभाग असे. त्यांची भाषणो अभ्यासपूर्ण असत. 
शिवसेना ही मुस्लिमविरोधात नाही, हे त्यांनी आपल्याबरोबर अनेक मुस्लिम कार्यकर्ते शिवसेनेत आणून सिद्ध केले. चंद्रकांत भोईर, दिलीप कपोते, अंबरनाथचे गडकरी, कल्याणचे सुभाष साईवाले, दीपक सोनाळकर, प्रशांत मुल्हेरकर, तुषार राजे, भगवान खराटे, रत्नाकर चासकर, उल्हासनगरचे दिलीप मालवणकर असे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडविले. त्यात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागांतील जमिनीच्या वादातून होणारे तंटे, मारामा:यांत त्यांनी लक्ष घातल़े त्याबरोबरच कल्याणातील वाडेघरसारख्या एकेकाळी गुंड प्रवृत्तीचे गाव म्हणून दहशत असलेल्या या खेडय़ातील अनेक तरुणांना शिवसेनेच्या माध्यमातून सत्प्रवृत्तीच्या मार्गाला लावले.
शिवसेनेतर्फे त्यांनी कल्याण नगरपालिकेच्या थेट अध्यक्षपदाची निवडणूक लढविली. त्यात त्यांना तत्कालीन जनसंघाचे भगवानराव जोशी यांच्याकडून अवघ्या 3क्क् मतांनी पराभव पत्करावा लागला होता. अंबरनाथमधून ते विधानसभेवर निवडून गेले होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना कामगार मंत्रीपदाचाही कार्यभार त्यांनी सांभाळला़ त्या वेळी डॉ. दत्ता सामंत, कृष्णराव धुळप, आर.जी. कर्णिक, मनोहर कोतवाल असे अनेक दिग्गज कामगार नेते या क्षेत्रत कार्यरत होत़े गोदरेज कंपनीतील कामगारांचा प्रश्न, नॅशनल रेयॉन कंपनीतील टाळेबंदी, आयडीआयमधील संप, मुंबईतील गिरणी कामगारांचे प्रश्न अशा अनेक प्रसंगांत अत्यंत तटस्थतेची भूमिका घेऊन कामगार हिताचे निर्णय त्यांनी घेतले. कामगार संघटना, नेते यांच्याबद्दलची मते, त्यांच्या भूमिका यात आपली मते ते स्पष्टपणो मांडत. हे सर्व करतानाच ठाणो जिल्ह्यात शिवसेनेचेही त्यांनी समर्थपणो नेतृत्व केले. आनंद दिघे यांना त्यांची उत्तम साथ मिळाली. त्यांच्या काळात गटबाजीच्या राजकारणाला थारा नव्हता.
गेली काही वर्षे प्रकृती साथ देत नसल्याने ते सक्रिय राजकारणातून बाजूला झाले होते. तरीही, घरी येणा:या कार्यकत्र्याशी, मित्रंशी गप्पा मारताना आपल्या जुन्या कार्यकत्र्याच्या स्मृतींना ते उजाळा देत, त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी करीत. कल्याणात दुर्गाडी किल्ल्याजवळ छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबरोबर साबीर शेख मंचावर उपस्थित होते. तोच त्यांचा शेवटचा कार्यक्र म असेल, याची कुणाही कार्यकत्र्याला कल्पना नसेल.
 
अण्णा बेटावदकर