शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वादच नको! शिवाजीपार्क ना ठाकरेंना, ना शिंदेंना? महापालिकेची सावध भुमिका; उद्धव ठाकरे उद्या काय बोलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 22:24 IST

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या गोरेगावमध्ये जाहीर सभा आहे. दसरा मेळाव्याआधीच ही सभा होत असल्याने ते या वादावर काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खरी शिवसेना कोणाची हा वाद अद्याप कायम असताना मुंबई महापालिका कोणता निर्णय घ्यावा या पेचात अडकलेली आहे. अशातच शिंदे गटाला बीकेसीतील ग्राऊंड दसरा मेळाव्यासाठी मिळालेले आहे. मात्र, दोन्ही गट शिवाजीपार्कसाठी आक्रमक असून पालिकेने सावध भूमिका घेतल्याचे समजते आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या गोरेगावमध्ये जाहीर सभा आहे. दसरा मेळाव्याआधीच ही सभा होत असल्याने ते या वादावर काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळाले असले तरी ठाकरे गटाला कोणतेही मैदान देण्यात आलेले नाही. यामुळे मोठ वाद उद्भवण्याची शक्यता आहे. 

शिंदे किंवा ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर परवानगी देऊ नये, असा पालिकेचा अभिप्राय असल्याचे समजते आहे. न्यायालयात खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न प्रलंबित आहे. यामुळे पालिकेने एका गटाला शिवाजी पार्क दिला तर नाराजी ओढवून घेतली जाऊ शकते. याबाबत विधी आणि न्याय विभाग दोन दिवसांत अहवाल देणार आहे. एकाला परवानगी दिली तर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता. यामुळे आपण निर्णय न घेतलेला बरा, अशी भूमिका या अभिप्रायामध्ये घेण्यात आल्याचे समजते आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. 

राऊतांचाही इशारा...शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होऊ नये, यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहेत. तर दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीति आखल्याचेही बोलले जात आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दसरा मेळाव्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला. संजय राऊत यांनी न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना दसरा मेळाव्याबाबत आक्रमक होत महापालिका आणि शिंदे-भाजप सरकारला थेट इशारा दिला आहे. शिनसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करणे ही आमची परंपरा आहे. परवानगी नाही दिली आतमध्ये घुसून दसरा मेळावा घेऊ, असा इशारा संजय राऊतांनी दिला. दुसरीकडे, शिवतीर्थावर नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसताना शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान नाकारल्यास शिवसेना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, मुंबई महापालिकेने निर्णय घेण्यास उशीर लावला आणि हे प्रकरण आणखी ताणले गेल्यास शिवसेना थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDasaraदसराShiv Senaशिवसेना