शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

 शिवाजी महाराजांचे पुतळे शोभेसाठी नाहीत, प्रेरणा घेण्यासाठी : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 15:59 IST

शिवाजी महाराज यांचे पुतळे हे शोभेसाठी नाहीत तर प्रेरणा घेण्यासाठी उभारले जातात, त्यामुळे देशातील महत्वाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहायला मिळतो असे  गौरव उदगार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. बेळगाव तालुक्यातील कडोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण कार्यक्रमात सहभागी झाल्यावर बोलत होते.

ठळक मुद्दे शिवाजी महाराज यांचे पुतळे शोभेसाठी नाहीत तर प्रेरणा घेण्यासाठी : शरद पवारबेळगाव तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण

बेळगाव  : शिवाजी महाराज यांचे पुतळे हे शोभेसाठी नाहीत तर प्रेरणा घेण्यासाठी उभारले जातात, त्यामुळे देशातील महत्वाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहायला मिळतो असे  गौरव उदगार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. बेळगाव तालुक्यातील कडोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण कार्यक्रमात सहभागी झाल्यावर बोलत होते.यावेळी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वनमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार अंजली निंबाळकर, श्रीमंत पाटील, लक्ष्मी हेब्बाळकर, चंदगडच्या आमदार संध्याताई कुपेकर आदी उपस्थित होते.पवार पुढे म्हणाले, की देशात अनेक राज्य होऊन गेले, पण रयतेच राज्य हे फक्त शिवाजी महाराज यांचेच होते. ते स्त्रियांचा आदर करत होते, म्हणून आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. शिवाजी महाराजांचे पुतळे दिल्लीत संसद भवन, गुजरात, आग्रा अश्या देशातील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. शिवछत्रपती हे पहिले  राजा ज्यानी  समुद्राचे महत्व ओळखल होत, असेही ते म्हणाले.

दुपारी साडे बारा वाजता पवार तर दोन  वाजता सिद्धरामय्या यांचे सभा स्थळी आगमन झाले होते. शिवाजी महाराज हे मराठा समाजाचे फक्त प्रतीक नाहीत तर ते संपूर्ण देशाचे स्वाभिमान आहेत असे सिद्धरामय्या यांनी म्हटलं.शिवाजी महाराज हे महापुरुष कोणा एका जातीचे आणि धर्माचे नाहीत ते संपूर्ण भारताचे प्रेरणा स्थान आहेत शिवाजी महाराज हे कधी धर्मा धर्मामध्ये संघर्ष व्हावे यासाठी लढले नाहीत पण आज धर्मा-धर्मामध्ये लढवल जात आहे हे दुर्दैव आहे अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारsiddaramaiahसिद्धरामय्याbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर