शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जाणता राजा फक्त शिवाजी महाराज; उदयनराजेंची पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 13:49 IST

उदयन राजे शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, शिवसेना जेव्हा नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला आला हाेता का ?

पुणे : आज अनेकांना जाणता राजाची उपमा दिली जाते. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. अशी उपमा काेणालाही दिली जाते त्याचा मी निषेध करताे. जानता राजा उपमा देताना विचार करावा, अशी टीका उदयनराजे भाेसले यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली.  पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. त्यांनी यावेळी शिवसेना तसेच शरद पवरांवर जाेरदार टीका केली.उदयनराजे म्हणाले,  जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज. अनेकांना जाणता राजाची उपमा देतात. त्याचाही मी निषेध करताे. जानता राजा उमपा देताना विचार करण्याची गरज आहे. शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, शिवसेना जेव्हा नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला आला हाेता का ? दादरमधील शिवसेना भवन येथे शिवाजी महाराजांचा फाेटाे बाळासाहेब ठाकरे यांच्या खाली लावण्यात आला आहे, त्यावर शिवसेनेने उत्तर द्यायला हवे. महाविकास आघाडीचे राजकारण चुलीत गेले.  मी आजपर्यंत समाजकारण केलं. महाशिवआघाडी मधून शिव का काढलं ? साेयीप्रमाणे राजकारण करायचं ही यांची लायकी. शिववडा नावाचा वडापाव सुरु करण्यात आला. शिवाजी महाराजांचे नाव वडापावला देता ? आम्ही शिवसेना नावावर कधी हरकत घेतली नाही. महाराजांचे वंशज असलाे तरी विचारांचा वारसा हा सर्व देशाला लाभला आहे. देशातील प्रत्येकजण शिवाजी महाराजांचे माेठे कुटुंब आहे. महाराजांनी कधी जातीभेद केला नाही. 

छत्रपती शिवाजी महाराजांशी काेणीही बराेबरी करु शकत नाही : उदयन राजे 

आमदार, खासदार यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा असतात त्यांना कोणी जाब विचारणार आहे की नाही ? यापुढे महाराजांचे नाव घेताना तसे वागा अन्यथा घेऊ नका. तुमच्या अपयशाचे, गैरवावहाराचे खापर आमच्यावर फोडू नका. महाराज सर्वांचे आहेत, कुटुंबाचे नाहीत. आजपर्यंत महाराजांच्या नावाचे फक्त राजकारण केले. आज चार हजार जाती झाल्या आहेत. लोक जातीवर मतदान करतात. भिवंडी दंगल, इतर जातीय दंगली घडल्या. जाणते राजे म्हणवून घेणारे राजकारणापलिकडे काही विचार करत नाहीत.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना