शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: राणेंविरोधातील शिवसेनेची खेळी अंगलट?, कोकणात भाजपला संजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 10:55 IST

Narayan Rane, Shiv sena clash: आक्रमकपणे तोंड देण्यास सज्ज; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झाली होती फरफट. मंगळवारचा दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी तणावात गेला. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते, असे चित्र होते. शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशाच लढाईचे हे चित्र होते.

- मनोज मुळ्येलोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शिवसेनेने कोणत्याही उद्देशाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली असली, तरी ही अटक, त्यासाठी झालेले आंदाेलन या सर्वातून स्थानिक भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जिल्ह्यात बलाढ्य असलेल्या शिवसेनेला सामोरे जाण्याचे धाडस भाजपमध्ये नव्हते. मात्र, आता अटकेच्या प्रकारानंतर भाजपही शिवसेनेला आक्रमकपणे तोंड देण्यास सज्ज झाला आहे. या कारवाईमुळे दुखावले गेलेले नारायण राणे आता अधिक आक्रमकपणे वाटचाल करतील, अशी शक्यता असल्याने भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

मंगळवारचा दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी तणावात गेला. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते, असे चित्र होते. शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशाच लढाईचे हे चित्र होते.या साऱ्याची ठिणगी प्रथम चिपळुणात पडली. चिपळुणात शिवसेनेने राणे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. या घोषणाबाजीला माजी खासदार नीलेश राणे सामोरे गेले. चिपळुणात प्रथम या दोन पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. निदर्शने करणाऱ्यांना आवरा, असे नीलेश राणे आक्रमकपणे पोलिसांना सांगत होते. त्यामुळे अशा आंदोलनात मागे असणारे भाजपचे कार्यकर्ते तेवढ्याच त्वेषाने पुढे आले. चिपळूणनंतर आरवलीमध्येही शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तेथेही भाजप कार्यकर्ते मागे न हटता आक्रमकपणे पुढे आले. हा भाजपसाठी मोठा बदल आहे. 

आजवर भाजपचा आवाज दबलेलाच शिवसेना आणि भाजप यांची युती होती, तेव्हाही शिवसेनेच्या ताकदीमुळे भाजप कायम दबलेलाच पक्ष होता. आधी जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा असताना भाजपला फक्त दोन जागा होत्या. नंतर त्या पाच जागा झाल्यानंतर भाजपच्या वाट्याला एकच जागा आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही युती असली तरी शिवसेनेचे संख्याबळ मोठे असल्याने नेहमीच शिवसेनेने भाजपला पद देताना दुजाभाव दाखवला होता. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या मागून फरपटत जात होता.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा