शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक बिनविरोध करण्याचा सेनेचा प्रयत्न! शिवसेना नेते अनिल परब यांचे जाहीर आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 06:11 IST

एखाद्या आमदाराचे निधन झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या घरचे कोणी लढत असतील तर निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपल्या उमेदवार ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी तसे आवाहन केले आहे. 

एखाद्या आमदाराचे निधन झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या घरचे कोणी लढत असतील तर निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन परब यांनी पत्रकारांशी बोलताना केले. न्यायालयाच्या निकालानंतर ते म्हणाले की, ऋतुजा लटके यांचा राजीनामा नाकारण्यावरून खालच्या पातळीवर राजकारण झाले. ऋतुजा रमेश लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी ११ वाजता मंजूर होईल. त्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह आम्ही त्यांचा उमेदवारी अर्ज भरू, असे ते म्हणाले.

निवडणूक बिनविरोध करण्याबाबत भाजप वा मुख्यमंत्री शिंदे गट यांच्याशी चर्चा करणार का, असे विचारले असता परब यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की आज मी जाहीर आवाहन केले आहे, समोरून काय प्रतिसाद मिळतो ते आधी बघू, गरज पडली तर चर्चाही करू. 

राजीनाम्याशी संबंध नाही; शिंदे गटाचे स्पष्टीकरणऋतुजा लटके यांच्याबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे. वेळेत स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज लटके यांनी दिला असता तर पुढच्या अडचणी आल्या नसत्या. लटकेचा राजीनामा हा महापालिकेच्या अखत्यारितील प्रश्न होता, आमचा त्याच्याशी काहीएक संबंध नाही पण ठाकरे गटाकडून उगाच सहानुभूती घेतली जात आहे, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना केली. 

भाजपची ठाकरेंवर टीकाकम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पूर्वमध्ये पाठिंबा जाहीर केला होता. त्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, हिंदुत्व हीच ताकद असलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्यापासून दूर करण्याचा व्यापक कट हिंदुत्वविरोधी नेत्यांनी आखला असून कम्युनिस्टांनी दिलेल्या पाठिंबा त्या कटाचाच एक भाग आहे.

टॅग्स :Anil Parabअनिल परबShiv Senaशिवसेना