शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या 6 नगरसेवकांचा शिवसेनेतील प्रवेश अधिकृत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 22:26 IST

नगरसेवक पक्षांतर प्रकरणात कोकण विभागीय आयुक्तांनी मनसेला मोठा दणका दिला आहे. मनसेतून शिवसेनेत प्रवेशकर्ते झालेल्या मनसेच्या 6 नगरसेवकांच्या अधिकृत गटाला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई : नगरसेवक पक्षांतर प्रकरणात कोकण विभागीय आयुक्तांनी मनसेला मोठा दणका दिला आहे. मनसेतून शिवसेनेत प्रवेशकर्ते झालेल्या मनसेच्या 6 नगरसेवकांच्या अधिकृत गटाला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती समोर आली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेकडून या नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. तर या सहा नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे वेगळ्या गटाची केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक : 

अर्चना भालेराव (वॉर्ड क्र. 126)

परमेश्वर कदम (वॉर्ड क्र. 133)

अश्विनी मतेकर (वॉर्ड क्र. 156)

दिलीप लांडे (वॉर्ड क्र. 163)

हर्षल मोरे (वॉर्ड क्र. 189)

दत्ताराम नरवणकर (वॉर्ड क्र. 197)

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = 227

शिवसेना अपक्षांसह - 84 +  4 अपक्ष = 88

भाजप अभासे आणि एक अपक्षासह - 83+अपक्ष 2= 85

कॉंग्रेस - 30

राष्ट्रवादी कॉंग्रेस - 9

मनसे - 7 (यातील 6 नगरसेवक आता सेनेत दाखल होतील)

सपा - 6

एमआयएम - 2

शिवसेनेत गेलेल्या सहाही नगरसेवकांना स्वतंत्र गट स्थापन करू देऊ नका - मनसेमुंबई महानगर पालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यांनी कोकण भवनात जाऊन आयुक्त सामान्य प्रशासन विभागातील अधिका-यांची भेट घेतली होती. मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांना स्वतंत्र गट स्थापन करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी यावेळी मनसेच्या नेत्यांनी केली होती. अशा आशयाचे निवदेन त्यांनी कोकण आयुक्त सामान्य प्रशासन विभागातील अधिका-यांना दिले होते.  

सत्तेसाठी रस्सीखेच : शिवसेनेकडे ८४ अधिक तीन अपक्ष व आता मनसेचे सहा असे ९४ नगरसेवक आहेत. भाजपाकडे ८२ अधिक दोन अपक्ष असे ८४ नगरसेवक आहेत. त्यात भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक होईल. या प्रभागात भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपाचे संख्याबळ ८५ होईल. काँग्रेसचे दहा नगरसेवक फोडल्यास भाजपाकडे ९५ म्हणजे शिवसेनेपेक्षा एक नगरसेवक अधिक असेल. 

टॅग्स :MNSमनसेShiv Senaशिवसेना