शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

'मुलगा शिंदे गटात गेल्याने शिवसेनेवर परिणाम होणार नाही'; सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 8:21 PM

'माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे.'

मनोहर कुंभेजकर

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पुन्हा एकदा शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर आता सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

आपल्या मुलाच्या पक्षप्रवेशावर सुभाष देसाई म्हणाले की, 'माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या  कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.' 

'शिवसेना, वंदनीय  बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढे सुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे,' अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी दिली.

"...म्हणून मी एकनाथ शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला"शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भूषण देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  बाळासाहेब हेच माझे दैवत आहेत. महाराष्ट्राचा विकास आणि बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. मी त्यांचे काम पाहिले आहे. त्यांच्या कामाची पद्धतही माहीत आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला, असं भूषण देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच या निर्णयाबाबत मी वडील सुभाष देसाई यांना माझ्या निर्णयाबद्दल आधीच कल्पना दिली होती, अशी माहिती देखील भूषण देसाई यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे