शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, सत्तेत राहून मात्र विरोध करणार- विनायक राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 21:27 IST

महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व कुठे दिसत नाही. त्यामुळेच शिवसेनेला सत्तेमध्ये राहूनही आंदोलने करावी लागत आहेत. याचा अर्थ सत्तेतून बाहेर पडणार असा होत नाही, असा खुलासा खासदार विनायक राऊत यांनी केला. दसरा मेळाव्यात शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत ही राऊत यांनी दिले ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सावंतवाडी, दि. 25 - महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व कुठे दिसत नाही. त्यामुळेच शिवसेनेला सत्तेमध्ये राहूनही आंदोलने करावी लागत आहेत. याचा अर्थ सत्तेतून बाहेर पडणार असा होत नाही, असा खुलासा खासदार विनायक राऊत यांनी केला. दसरा मेळाव्यात शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत ही राऊत यांनी दिले ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.खासदार राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी गाव पॅनेल आहे, तेथे शिवसेनेचे सहकार्य राहणार आहे. मात्र जेथे स्वबळावर लढण्याचे ठरवण्यात आले आहे तेथे शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढवेल, असे स्पष्ट केले. आमची लढाई अद्याप कोणाशी ठरली नाही. गावात राणेंच्या समर्थ विकास पॅनेलला कोणीही साथ देणार नाही. तर काँग्रेस पूर्णपणे खिळखिळी झाली आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.नारायण राणे हे आमच्यावर टक्केवारीचे आरोप करतात. त्यांची सवय आम्हाला चांगली माहीत आहे. मी एक महिन्याचा कालावधी देतो. त्यांनी एक तरी ठेकेदार दाखवून द्यावा ज्याच्याकडून आम्ही टक्केवारी घेतो. ठेकेदार कंपनी राणेंचीच आहे. कोणाचे ते त्यांनी प्रतिज्ञापत्र घ्यावे, असे आव्हान यावेळी राऊत यांनी दिले. शिवसेना दसरा मेळाव्यात सत्तेतून बाहेर पडणार का, असे विचारले असता त्यांनी याबाबतचा निर्णय सर्वस्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याचे स्पष्ट केले.मात्र, शिवसेना सत्तेमध्ये राहून करत असलेल्या आंदोलनाबाबत विचारले असता सध्या विरोधी पक्ष कुठेच दिसत नाही. त्यामुळे आम्हाला सत्तेमध्ये राहून आंदोलने करावी लागतात. याचा अर्थ सत्तेमधून बाहेर पडणार असा होत नाही. सत्तेमध्ये राहूनही लोकांची कामे होऊ शकतात, मग सत्तेतून बाहेर का पडावे, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. राणे यांच्या भाजपा प्रवेशामुळे शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. राणे आले म्हणून शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, उलट सहा महिन्यात मित्रपक्ष भाजपलाच राणेंना घेतल्याचा पश्चाताप होईल. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणताही त्रास नाही. ते निवांतपणे काम करतात. पण राणे आल्यानंतर त्यांना त्रास देण्यास सुरू करतील. जिल्ह्यातील भाजपचे नेते सध्या चांगले काम करीत आहेत. पण त्यांनाही राणे  भाजपात आल्यावर काय ते कळेल त्याची आम्हाला काळजी वाटते, असा उपरोधिक टोलाही राऊत यांनी भाजप नेत्यांना हाणला.