शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना संपवून दाखवा, उद्धव ठाकरेंचे भाजपच्या जे.पी. नड्डांना खुले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 09:27 IST

भाजप प्रादेशिक अस्मिता चिरडतोय : उद्धव ठाकरे 

भाजपसोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष, कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार, शिवसेनाही संपणार हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे. त्यांनी शिवसेना संपवूनच दाखवावी, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. भाजप प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्र परिषदेत ठाकरे म्हणाले की,  भाजपचा वंश कुठून सुरू झाला, हे पाहायचे आहे. इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येत आहेत, तर भाजपचा वंश कोणता आहे? यापुढे केवळ भाजपच  टिकणार हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे.  सर्वच लोकांनी आता डोळे उघडून पाहायला पाहिजे. ते जिथे नेऊ इच्छितात तिथे नेऊ द्या. त्यात मदत करायची की नाही, हे सामान्य नागरिकांनी ठरवायची वेळ आली आहे.सोबत येतील ते काही काळ आपले गुलाम. काम संपल्यावर नवीन गुलाम येतील. हे गुलाम जातील. पुन्हा नवे येतील. प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची, हिंदूत फूट पाडायची, राजकारण्यांच्या तुंबड्या भरायच्या, हे भाजपचे कारस्थान आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

जे. पी. नड्डा बोलले ते ठाकरेंच्या शिवसेनेबाबत  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आता राहिली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेबाबत ते म्हणालेले नाहीत. ही वस्तुस्थिती कृपया लक्षात घ्या. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नका, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. संजय राऊत यांच्यावरील कारवाई ही पूर्णपणे पुराव्यांच्या आधारावर सुरू आहे. न्यायालयच पुढचा निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

संसदीय बहुपक्षीय लोकशाही ही देशातील भौगोलिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, सामाजिक, भाषिक विविधतेचे प्रतिनिधित्व करते. प्रादेशिक पक्ष संपुष्टात आणण्याची मानसिकता लोकशाहीविरोधी तर आहेच, पण विविधता अमान्य करणारी आहे. - सचिन सावंत, काँग्रेस नेते

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेJ P Naddaजगत प्रकाश नड्डाShiv Senaशिवसेना