शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार केलेले लोक खांद्याला खांदा लावून शिंदेंसोबत आहेत; अंबादास दानवेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 15:21 IST

मुंबई महापालिकेतील कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीच्या धाडीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

छत्रपती संभाजीनगर : मुंबई महापालिकेतील कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीच्या धाडीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. दरम्यान, ईडीच्या धाडीवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. 

"ईडीच्या धाडी पडत आहे, जाणीवपूर्वक शिवसैनिकांना टार्गेट केले जातंय. मुख्यमंत्री हे ज्यांच्या खांद्याला खांदे लावून बसतात त्यांच्यावर कारवाई होत नाही. भ्रष्टाचार केलेले लोक खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत, मात्र प्रामाणिक काम करणाऱ्यांवर धाडी टाकतात. भ्रष्टाचारी मोठे शिंदे आणि छोटे शिंदेंसोबत असतात. जाणीवपूर्वक ईडीच्या कारवाया होत असून शाखा नाही तर नारायण राणे यांचा बंगला किती अनधिकृत होता आणि काय कारवाई केली हे पाहणे महत्वाचे आहे", अशा शब्दांत दानवेंनी राज्य सरकारवर टीका केली.  तसेच ४ पोलीस आले आणि शाखेत गेले म्हणजे आम्ही घाबरलो असे नाही, आम्ही ईडीला घाबरत नाही हे तर ४ पोलीस आहेत. इतर पक्षांच्या पण शाखा आहेत, एकच शाखा नाही मुंबईमध्ये, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी, अशी मागणी दानवेंनी केली. अजित पवार यांनी विरोधीपक्षनेतेच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केल्यानंतर दानवे म्हणाले की, अजित पवारांनी पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत संघटनेचे काम वाढविण्यासाठी अजित पवार तसे म्हणाले असतील.

"जनता अब्दुल सत्तारचा तोरा उतरवल्याशिवाय राहणार नाही"मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले, "अब्दुल सत्तार यांच्यावर दररोज आरोप होतात. लोक भीतीने शांत बसायचे. अब्दुल सत्तार यांच्यावर एक नाही तर हजारो आरोप होऊ शकतात असे अब्दुल सत्तार यांचे काम आहे. अब्दुल सत्तार यांचे शेकडो आरोप आहेत. आधी महसूल मंत्री असताना ही घोटाळा केला आहे, जनता अब्दुल सत्तारचा तोरा उतरवल्याशिवाय राहणार नाही. मी त्याच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याची वाट पाहत आहे. मग कळेल कोणती कोणती त्यांची अब्रू बाकी आहे." 

 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAbdul Sattarअब्दुल सत्तार