शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. "आपले पंतप्रधान आणि त्यांचे समर्थक स्वतःला देवाचे अवतार समजतात, असा घणाघात करत राऊतांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राऊत म्हणाले की, “या देशात उपराष्ट्रपती सरकारच्या आदेशाला न जुमानल्यास त्यांचा २४ तासांत राजीनामा घेतला जातो. मात्र, जेव्हा पहलगाम हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू होतो, तेव्हा सरकार कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही, ना कुणाकडून राजीनामा घेतला जातो, ना कुठली माफी मागितली जाते. पंतप्रधान म्हणतात की, कोणतीही घटना घडण्याआधीच त्यांना कुणकुण लागते, ही ईश्वराची कृपा आहे. मग पहलगाममधील हल्ल्याची कुणकुण त्यांना का लागली नाही?” असा परखड सवाल करत संजय राऊत यांनी थेट पंतप्रधानांनाच लक्ष्य केले.