शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पुढचा CM काँग्रेसचा; विश्वजित कदमांच्या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते स्पष्ट बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 18:15 IST

Shiv Sena Thackeray Group News: नाना पटोले किंवा विश्वजित कदम काय बोलतात, त्याला काँग्रेसमध्ये महत्त्व आहे, असे वाटत नाही, असा टोला ठाकरे गटाने लगावला.

Shiv Sena Thackeray Group News: एकीकडे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्रीपदावरून आता दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारली असली तरी अपक्ष म्हणून उभे राहून जिंकलेल्या खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, ठाकरे गटातील नेत्यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना सर्वाधिक मत्ताधिक्य मिरजेने दिले, ही निवडणुक सोपी नव्हती. ज्या पक्षात आम्ही काम करत होते, त्याचे पक्षाचे तिकिट मिळत नव्हते. अन्याय होत असल्याचे पाहून जनतेनेच या निवडणुकीत साथ दिली. जनतेने काँग्रेस पक्षाला आणि पक्षाच्या विचाराला साथ दिली. काँग्रेसचे विचार वाचविण्यासाठी जनतेने ही निवडणुक हातात घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल, असे विश्वजित कदम यांनी म्हटले. यावर  ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.

येणाऱ्या काळात काहीही होऊ शकते

अजूनपर्यंत विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली नाही. जागावाटपाची चर्चाही सुरू झालेली नाही. खरे तर मुख्यमंत्री कोण होईल, हा निवडणुकीनंतरचा विषय आहे. मागच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल, असे कुणालाही वाटले नव्हते, पण ते मुख्यमंत्री झाले. आधी किमान जागावाटप तरी होऊ द्या, येणाऱ्या काळात काहीही होऊ शकते, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, येणाऱ्या काळात महायुतीचे सरकार बदलणे जास्त महत्त्वाचे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची फक्त एक जागा आली होती. तो शिवसेनेचा माजी आमदार होता. मुळात काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व परिपक्व आहे. नाना पटोले किंवा विश्वजित कदम काय बोलतात, त्याला काँग्रेसमध्ये महत्त्व आहे, असे वाटत नाही. केंद्रीय नेतृत्वाला या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे, असे दानवे म्हणाले.

 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेVishwajeet Kadamविश्वजीत कदमMahavikas Aghadiमहाविकास आघाडी