शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

"आज 'जाणता राजा' समाधानी झाला असेल..."; शिवसेनेबाबतच्या निर्णयानंतर भाजपाचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 00:20 IST

"यालाच म्हणतात दोस्तीचे  ढोंग अन् पाठीत  खंजीर...", असेही राम कदम यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Shiv Sena Symbol, Ram Kadam vs Sharad Pawar: महाराष्ट्रात जून महिन्यात राजकीय उलटफेर झाला. शिवसेनेतून ५० आमदारांनी बंड केले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळे झाले. त्यानंतर, आकड्यांच्या बळावर, शिवसेना हा पक्ष आमचाच आहे असा दावाही शिंदे गटाकडून करण्यात आला. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची... ठाकरेंची की शिंदेंची? याचा फैसला निवडणूक आयोगात होणार आहे. पण तत्पूर्वी, अंधेरीची पोटनिवडणूक लागली असल्याने पक्ष चिन्ह आणि नावाचा काय फैसला होतो याकडे साऱ्यांचे लक्ष होते. निवडणूक आयोगाने तात्पुरते या पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवून ठेवले असून, शिवसेना हे नाव किंवा धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे किंवा शिंदे कोणालाच वापरता येणार नाही. या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येत असतानाच, भाजपाचे राम कदम यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर टीका केली.

"असं ऐकायला मिळतंय की आज बारामतीमध्ये फटाके फोडले जात आहेत. कदाचित दीर्घकाळापासून बघितलेलं 'त्यांचं' स्वप्न आज पूर्ण झालंय. आज 'जाणता राजा' समाधानी झाला असेलच. यालाच म्हणतात दोस्तीचे  ढोंग अन् पाठीत  खंजीर... किंवा घर न सोडणाऱ्या नेत्याच्या ('किंबहुना'च्या) भाषेत गद्दारी", अशा शब्दांत भाजपाचे आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

--

दरम्यान, अंधेरीची विधानसभा पोटनिवडणूक ३ नोव्हेंबरला होणार असून त्यासाठी १० तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव कोण वापरणार यावर अनेकविध चर्चांना उधाण आले होते. तशातच, आज निवडणूक आयोगाने हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात गोठवले असून अंधेरीच्या निवडणुकीत ठाकरे किंवा शिंदे गटाला हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवण्यात आले आहे, त्यामुळे शिवसेना नक्की कोणाची, यावर अजूनही ऊहापोह शिल्लक आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारRam Kadamराम कदम