शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

“मी काही बोलले की...”; उद्धव ठाकरेंच्या वक्फ विधेयकाच्या विरोधावर नीलम गोऱ्हेंची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:12 IST

Shiv Sena Shinde Group Neelam Gorhe On Waqf Board Amendment Bill: वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला.

Shiv Sena Shinde Group Neelam Gorhe On Waqf Board Amendment Bill: दोन दिवस दिवसभर वादळी आणि प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर अखेरीस वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आधी लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. आता राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की, याचा कायदा अस्तित्वात येईल. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर सविस्तर चर्चा केली. यावरून राजकीय वर्तुळातही दावे-प्रतिदावे केले असून, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी या विधेयकावर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना टोलेबाजी केली.

वक्फ बोर्ड विधेयकात काही चांगल्या सुधारणा आहेत. अफरातफरीला पायबंद बसून पारदर्शकता आली पाहिजे. पण, काही गोष्टी भाजप उकरून काढत आहे. फटाक्याची वात पेटवून पळून जायचे. ते फुटून झाले की मिरवायला यायचे, ही भाजपची वाईट सवय आहे. आम्हीच सगळे काही केले या वृत्तीचा आम्ही विरोध केला आहे. विधेयकाला विरोध करण्यापेक्षा भाजपच्या ढोंगाला आणि जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना काही देणार आहे त्या भ्रष्टाचाराला विरोध केला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावरून भाजपासह महायुतीतील नेते ठाकरे गटावर तिखट शब्दांत हल्लाबोल करत आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही यावर बोलताना ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंच्या वक्फ विधेयकाच्या विरोधावर नीलम गोऱ्हेंची खोचक टीका

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, वक्फ विधेयकावर मी बोलेल. परंतु, त्यांच्यावर मी बोलणार नाही. मी बोलले की, त्यांच्या खूप जिव्हारी लागते, असे म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. १९८४ ला शाह बानो  प्रकरणात पोटगीचा अधिकार नाकारला. तेव्हा त्या महिलेला वक्फ बोर्डाच्या माध्यमातून पोटगी देण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले होते. तेव्हा पहिल्यांदा वक्फ शब्द आला होता. परंतु, माझ्या माहितीप्रमाणे वक्फ बोर्डाने असे कोणतेही पैसे दिले नाहीत, असा दाखला देत नीलम गोऱ्हे यांनी वक्फ विधेयकाचे समर्थन केले आहे. 

दरम्यान, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून देशभरात सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्यातच हे विधेयक संसदेच्या सभागृहात मंजूर करताना झालेल्या मतदानावेळी शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या २ खासदारांच्या अनुपस्थितीने सगळ्यांचे लक्ष वेधले. लोकसभेत शरद पवारांच्या पक्षाचे २ आणि राज्यसभेत स्वत: शरद पवार मतदानावेळी गैरहजर होते. इतके महत्त्वाचे विधेयक पारित होताना शरद पवारांनी गैरहजेरीने त्यांच्या भूमिकेबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डShiv SenaशिवसेनाNeelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरे