शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:59 IST

Sanjay Shirsat News: शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे, असे खुद्द चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे.

Sanjay Shirsat News: विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. एकीकडे पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात ठाकरे गटाला यश येताना दिसत नाही, तर दुसरीकडे पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे पक्षातील नेते, पदाधिकारी यांची हकालपट्टी करताना पाहायला मिळत आहेत. दिवाळीनंतर महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांच्यासाठी या आगामी निवडणुका खडतर ठरण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश थांबवून दाखवावा, असे खुले आव्हान शिंदेसेनेने उद्धव ठाकरेंना दिले आहे. 

सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीमुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलाच वाद रंगला होता. लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस पक्ष प्रचंड नाराज झाला होता. अखेरपर्यंत ठाकरे गटाने ही जागा सोडली नाही. शेवटी काँग्रेसकडून उमेदवार असलेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. परंतु, ज्यांच्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसला भिडले, तेच चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. चंद्रहार पाटील यांनी एक्सवर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. चंद्रहार पाटील यांच्या प्रक्षप्रवेशाबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला आव्हान दिले. 

चंद्रहार पाटील यांनी एक्स पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

माझ्या पक्षप्रवेशाबाबतीत मी अधिकृत भूमिका घेतली नाही. शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे. पक्षप्रवेश करायचा आणि पक्ष सोडायचा याबाबतचा निर्णय अजून घेतला नाही. सध्या मी बाहेर गावी असून माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईन, असे चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे. 

संजय शिरसाट यांनी दिले ठाकरे गटाला आव्हान

पत्रकार परिषदेत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, चंद्रहार पाटील हे सोमवारी अर्थात ९ जूनला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हिंमत असेल तर थांबवून दाखवा, असे आव्हान संजय शिरसाट यांनी दिले. तत्पूर्वी, डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळ येथे भेट घेतली होती. मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्तीने ही भेट झाल्याची चर्चा होती. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटchandrahar patilचंद्रहार पाटील