शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: आयारामांच्या भरवश्यावर उद्धव ठाकरेंची शिवसेना; शीतल म्हात्रेंनी यादीच दिली, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:20 IST

Maharashtra News: ही यादी दिल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी अजून कोण उरलेय का, असा खोचक सवालही केला आहे.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये घेतलेल्या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याच ठिकाणी, त्याच मैदानात सभा घेतली. शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. यानंतर आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी एक यादी शेअर करत उद्धव ठाकरे गट आयारामांच्या भरवश्यावर असल्याचा खोचक टोला लगावला आहे. 

शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ठाकरे गटातील आयारामांची यादी दिली आहे. कोण कोणत्या पक्षातून ठाकरे गटात आलाय आणि सध्या त्यांच्याकडे काय जबाबादारी आहे याची माहितीच शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. तसेच ही यादी देतानाच खोचक कमेंटही केली आहे.

ही यादी दिल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी अजून कोण उरलेय?

सचिन अहिर-राष्ट्रवादी, सुषमा अंधारे–राष्ट्रवादी, भास्कर जाधव – राष्ट्रवादी, वैभव नाईक – काँग्रेस, मनिषा कायंदे – भाजप, प्रियंका चतुर्वेदी – काँग्रेस, संजना घाडी – मनसे, राहुल कानाल – काँग्रेस, साईनाथ दुर्गे – मनसे अशी काही नावांची यादी दिली आहे. ही यादी दिल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी अजून कोण उरलेय? असा सवालही केला आहे.

दरम्यान, खेड येथील गोळीबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या सभेला संबोधित करताना खोके आणि गद्दारी करून नव्हे तर खुद्दारी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला शिवसेनेचा धनुष्यबाण सोडवून आणल्याचे एकनाथ शिंदे ठणकावून सांगितले. सगळीकडे तीच टेप आणि फक्त दोन मुद्यांवर टीका हेच रडगाणे आता राज्यभर ऐकायला मिळणार असल्याचा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण