Shiv Sena Shinde Group News: राज्यातील सर्वसामान्य कुटुंबियांचा प्राथमिक आरोग्यावरील खर्च कमी करणे व त्यांना तातडीने सवलतीच्या दरात वैद्यकीय चाचण्या आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेने ‘शिवसेना समाज सेवा कक्ष’ आणि ‘शक्ती कार्ड’ हे विशेष सामाजिक उपक्रम सुरू केले आहेत. शिवसेना समाज सेवा कक्षाचे ‘महाराष्ट्र राज्य समन्वयक’ म्हणून चैतन्य रांगणेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून शक्ती कार्ड प्राथमिक आरोग्यावरील कौटुंबिक खर्च कमी करणारे व सेवा-व्यवस्थेशी थेट जोडणारे प्रभावी साधन ठरेल, असा विश्वास रांगणेकर यांनी व्यक्त केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समाज सेवा कक्षावर थेट लक्ष असेल. नागरिकांच्या तातडीच्या अडचणींचे जलद निराकरण, स्वयंसेवी संस्था, सामाजिक उत्तरदायित्व निधी व प्रशासनात प्रभावी समन्वय राखणे आणि समाजाभिमुख सेवांना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत खात्रीशीर पोहोचवण्याचा या कक्षाचे प्रमुख उद्देश असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. समाज सेवा कक्षाचा पहिला उपक्रम असलेल्या ‘शक्ती कार्ड’चे नुकताच ठाण्यात नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यावेळी सेवा, बळकटी आणि समाजकल्याणाचे प्रतीक असलेला अधिकृत लोगोचेही अनावरण करण्यात आले.
शक्ती कार्डधारकांना सरकारी वैद्यकीय योजनांव्यतिरीक्त प्राथमिक आरोग्य सेवा व कुटुंब-केंद्रित लाभ देणाऱ्या गरजू रुग्णांना ४० ते ५० टक्के सवलतीत एमआरआय आणि सिटी स्कॅन चाचणी, सवलतीच्या दरात ॲम्बुलन्स सेवा, मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात शस्त्रक्रिया, साप्ताहिक मोफत आरोग्य तपासणी (आठवडी ओपडी) व रक्त चाचणी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी तातडीची वैद्यकीय मदत व सहाय्य, महिलांसाठी अत्यल्प दरात सॅनिटरी पॅड्स, कौशल्यविकास व रोजगार-संधीसाठी शिबीरांचे आयोजन, २४x७ डॉक्टर ऑन-कॉल सेवा तसेच व्हॉट्सअप क्लिनिकद्वारे सेवा, सरकारी योजनांमधून मोफत शस्त्रक्रिया मार्गदर्शन व विविध स्वयंसेवी संस्थांकडून अतिगरजू लोकांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.
दरम्यान, शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना समाज सेवा कक्षाने नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांना ‘सीएसआर’शी जोडणारे सिंगल-विंडो समन्वय केंद्र बनवण्याचा संकल्प केला आहे. यातील प्रत्येक सेवेमध्ये गती, सन्मान आणि पारदर्शकता हा केंद्रबिंदू असेल.
Web Summary : The Shinde group launched 'Samaj Seva Kaksha' and 'Shakti Card' to reduce healthcare costs. 'Shakti Card' offers subsidized medical tests, ambulance services, and free eye checkups. It also provides skill development camps and 24/7 doctor-on-call services, aiming to connect citizens with CSR initiatives.
Web Summary : शिंदे गुट ने स्वास्थ्य सेवा खर्च कम करने के लिए 'समाज सेवा कक्ष' और 'शक्ति कार्ड' लॉन्च किया। 'शक्ति कार्ड' रियायती चिकित्सा परीक्षण, एम्बुलेंस सेवाएं और मुफ्त नेत्र जांच प्रदान करता है। इसका उद्देश्य नागरिकों को सीएसआर पहलों से जोड़ना है, साथ ही कौशल विकास शिविर और 24/7 डॉक्टर-ऑन-कॉल सेवाएं भी प्रदान करना है।