शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “मुलांच्या विधानाची जबाबदारी राणेंवर, सोबत काम करायचं असेल तर...”; केसरकरांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 14:51 IST

Maharashtra Political Crisis: दीपक केसरकर आणि राणे पिता-पुत्रांमधील वाद शमणार की, वाढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंडखोरी केली आणि भाजपसह नवे सरकार स्थापन केले. बंडखोरी का केली, यापुढची भूमिका काय, हे सर्वांना माहिती होण्यासाठी शिंदे गटाकडून दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडे प्रवक्तेपदाची धुरा देण्यात आली. अलीकडेच केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दीपक केसरकर यांना उद्देशून केलेल्या ट्विटचा समाचार त्यांनी घेतला आहे. 

माजी खासदार निलेश राणे यांनी केसरकरांना उद्देशून ट्वीट केले होते. यात उद्धव ठाकरेंबद्दल एवढे प्रेम असेल तर मातोश्रीवर भांडी घासावी असे म्हटले होते. यावर, नारायण राणेंच्या मुलाने केलेले ट्विट माझा अपमान आहे. यानंतर मात्र सिंधुदुर्गातल्या एकाही शिवसैनिकाला निषेध करावासा वाटला नाही, अशी खंत दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावे ही भूमिका मी सतत मांडत राहिलोय. पण किती दिवस वाट बघायची याला मर्यादा आहे. एकत्र येण्याच्या भूमिकेला रिस्पॉन्स  द्यायचा की, नाही हे ठाकरेंनी ठरवायचे आम्ही वाट बघितली आता जनतेच्या कामाला लागलोय. पुनर्नियुक्त्या आणि पक्षातील इतर बाबींविषयी एकनाथ शिंदेच निर्णय घेतील आणि बोलतील, असे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. 

तर मी प्रत्यक्ष नारायण राणेंशी बोलेन

राणेंची मुले कशी बोलतात याची काळजी घेण्याची जबाबदारी नारायण राणेंची आहे. नारायण राणेंशी माझा वाद नाही, त्याचे कार्यकर्ते जे वागतात त्यावर आक्षेप आहे. राणे त्यांच्या मुलांची काळजी घेण्यास समर्थ आहेत. मला सिंधुदुर्गाच्या हितासाठी जर राणेंसोबत काम करायचे असेल तर मी प्रत्यक्ष राणेंशी बोलेन, त्यांच्या मुलांशी का बोलेन, अशी विचारणा करत, मी सिनिअर आहे. वयाने सिनिअर आहे, राणे साहेबांच्या वयाचा आहे. नारायण राणे यांच्याशी व्यक्तिगत माझा कुठलाही वाद नाही. ज्याक्षणी कार्यपद्धती सुधारेल, माझा काहीच वाद राहणार नाही. नारायण राणे यांच्यातील मॅचुरीटी अनेक वर्ष काम केल्यामुळे आहे. ते खालून वर आलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यात कुणाशी बोलावे असे माझे मत नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDeepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणेNilesh Raneनिलेश राणे