शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जे शिंदे गटात गेले ते...; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 12:26 IST

२०२४ ला हे सगळे झुंडच्या झुंड आमच्या दारासमोर उभे राहतील. फक्त गळ्यातील उपरणे बदलतील असं संजय राऊतांनी म्हटलं.

मुंबई - खासदार संजय राऊत यांच्यावर शिवसेना उबाठा गटाच्या नाशिक प्रभारीपदाची जबाबदारी आहे. अलीकडेच राऊत यांनी नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. नाशिकमधील माजी उपमहापौरासह ११ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र शिंदे गटात प्रवेश केलेल्यांबाबत संजय राऊतांनी खळबळजनक आरोप केले आहेत. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, जे शिंदे गटात गेलेत ते दलाल आहेत. एकतर त्यांचे जमिनीचे व्यवहार आहेत. २ नंबरचे धंदे आहेत. त्यांच्यावर पोलीस यंत्रणेचा वापर करून दबाव आणून प्रवेश करायला लावतायेत. लालचेपोटी गेलेत. त्यांना निष्ठा, श्रद्धा, विचार नाहीत. जे गेलेले आहेत त्यांचा सगळ्यांचा व्यवसाय दलालीचा आहे. मंत्रालयात जाऊन दलाली करणे, कंत्राटदारी करणे, ज्याचे सरकार येईल त्यांच्याकडे जातात असा आरोप त्यांनी केला आहे. 

त्याचसोबत २०२४ ला हे सगळे झुंडच्या झुंड आमच्या दारासमोर उभे राहतील. फक्त गळ्यातील उपरणे बदलतील. ही राजकारणातील पद्धत आहे. दारू, मटका, झुगार व्यवसाय करणारे आहेत. इकडे तिकडे फिरतात. त्यांना कुठल्याही प्रकारची निष्ठा नाही. त्यामुळे ते गेलेल्यांचे दु:खं नाही. अगदी व्यवस्थित त्यांचा तपशील आम्ही देऊ शकतो. ज्यादिवशी हे सरकार पडेल तेव्हा हे सगळे बेवा होतील आणि आमच्या दारात येतील. तेव्हा आम्ही घेणार नाही असं स्पष्टीकरणही संजय राऊतांनी दिले आहे. 

नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्कानाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून या गटातील सुमारे १२ माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे. यामध्ये नाशिक महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते, माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांच्या बरोबरच सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, सुदाम डेमसे, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले, पुनम मोगरे, जयश्री खर्जुल, ज्योती खोले या माजी नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.  

ठाकरेंना धक्का! संजय राऊतांची पाठ फिरताच १२ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे