शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ, मिरवणुकीत युवकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 18:21 IST

Sanjay Gaikwad : दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर महिलेला धमकावून जमिन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बुलढाणा : आपल्या बेधडक आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर महिलेला धमकावून जमिन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीत युवकांना मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड हे युवकांना मारत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, बुलढाणा शहरातील ही घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड यांनी बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. विशेष, बाब म्हणजे आमदार संजय गायकवाड मारहाण करत असताना पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच आमदार संजय गायकवाड यांच्यावर जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर येथील रीटा उपाध्याय यांनी राजूर येथील दीड एकर शेतजमीन बळकावल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांच्यावर केला आहे. या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांचे पुत्र मृत्यूंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी वाघाच्या शिकार संदर्भात केलेल्या विधानावरून आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडbuldhanaबुलडाणाEknath Shindeएकनाथ शिंदेSocial Viralसोशल व्हायरलShiv Senaशिवसेना