शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

"बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या अन् मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 23:21 IST

हे सरकार स्थापन झालं तेव्हा दोन जण मंत्री झाले. मंत्री ठरवायला ४२ दिवस लागले. पण जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

मुंबई - मंत्र्यांना बंगले दिलेत, पण जिल्हे दिलेले नाहीत. पालकमंत्री आज गरजेचे आहेत. पण गद्दार सरकारचं लक्ष स्वतःवरच आहे जनतेवर नाही, अशी सडकून टीका शिवसेने नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी विधिमंडळात माध्यमांशी संवाद साधताना केली. यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांच्या चौकशीवर भाष्य करताना दिलखुलासपणे चौकशी करा आनंद आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंनी सांगितले की, हे सरकार स्थापन झालं तेव्हा दोन जण मंत्री झाले. मंत्री ठरवायला ४२ दिवस लागले. पण जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाही. खोके ओके हे काही झोमण्यासारखं नाही. मुख्यमंत्र्यांची भाषा योग्य नाही. या आमदावर कुणाचा अंकुश नाही. विभागाच्या पुनर्रचनेत कुणीही पाठिंबा दिला तरी चालेल कधीही निवडणुका घ्या आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत. आधी नियुक्ती केली जाते मग थांबवली जाते. हे सरकार फक्त स्वार्थासाठी सुरू आहे, अशी टीका आदित्य यांनी केली.

..अन् मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतातहिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. ज्या बाळासाहेबांच्या मुलाने सर्व काही दिलं त्याच्या पाठित खंजीर खुपसायचा. त्यामुळे यांच्यासाठी 'गद्दार'हा शब्दच योग्य आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

त्यांच्या मनात होते ते आम्ही पूर्ण केलं नाहीमिलिंद देवरा माझे मित्र आहेत. ही मैत्री आणखी वाढवायची होती. परंतु त्यांच्या मनात जे होते ते आम्ही पूर्ण करू शकलो नाही. देवरांनी निवडणुकीवरून काही स्वप्न होती. त्यात मी जाणार नाही. परंतु जी काही चौकशी करायची ती करा. आम्ही जनतेची सेवा केली आहे असं सांगत आदित्य ठाकरेंनी देवरांच्या आरोपांना उत्तर दिले. त्याचसोबत आम्हाला मार्केटिंग करता आली नाही. मैत्री आहे तर निभवावी लागेल असंही आदित्य ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस