शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

...तर तो गुन्हा आम्ही करणारच; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचे ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 10:22 IST

चिन्ह गोठवलं, नाव गोठवले एवढं झालं तरी लोक अजिबात खचले नाही. चौपट स्पिरीटनं लोक गर्दी करून जमले. कदाचित ही गर्दी बघून अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे असा टोला सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला लगावला.

मुंबई - सत्य मांडणे हा गुन्हा असेल तर हा गुन्हा आम्हाला मान्य आहे. तो आम्ही करणारच, ज्यादिवशी चिन्ह गोठवण्याची बातमी येते. त्यादिवशी महाप्रबोधन यात्रेची सुरुवात होते. त्यामुळे ठाण्यात झालेली गर्दी ही विरोधकांच्या डोळ्यात खुपली असेल, मला नोटीस आली तर पोलीस स्टेशनला हजर होईन. कायदा माझ्या बापानं लिहिला आहे. त्यामुळे त्याचा आदर मी करणार असं शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, १५३ अ नुसार गुन्हा झालाय हे कळालं. माझ्याकडे अद्याप नोटीस नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मी नक्कल केलेली नाही. माझ्याकडे व्हिडीओ असते तर मी मोदींचे व्हिडिओ दाखवले असते. मला सांगायची गरज पडली नसती. माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंनी केल्या आहेत. प्रश्न विचारण, सत्य मांडणे गुन्हा असेल तर आम्ही गुन्हेगार आहोत. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी दबावतंत्र सुरू आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच चिन्ह गोठवलं, नाव गोठवले एवढं झालं तरी लोक अजिबात खचले नाही. चौपट स्पिरीटनं लोक गर्दी करून जमले. कदाचित ही गर्दी बघून अस्वस्थ होणं. संजय राऊतांचे स्पिरीट आमच्याकडे आहे. ते स्पिरीट घेऊन आम्ही लढणार आहोत. नोटिशीला कायदेशीर उत्तर देऊ. खासदार राजन विचारे, विनायक राऊत, भास्कर जाधव, अनिता बिर्जे आणि मी अशा ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे असं सुषमा अंधारे यांनी सांगितले. 

काय आहे प्रकरण?ठाण्यात झालेल्या महाप्रबोधन यात्रेत शिवसेना नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली होती. या यात्रेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, दसरा मेळाव्यातील शिवसैनिकांची गर्दीच साक्ष देते की, आगामी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच असतील. काही लोकांनी दिलेल्या वचनांची आठवण करून देण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा आहे, असे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता म्हणाल्या. गद्दारांनी चिन्ह गोठवले, खुद्दारांचे रक्त पेटवले, ही घोषणा त्यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे