शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

नगरमध्ये शिवसेनेला करायचा होता भाजपाचा 'गेम', पण...; 'रामदासभाईं'नी सांगितला अंगाशी आलेला खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 14:22 IST

नगरच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केल्याचा आरोप शिवसेनेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.

ठळक मुद्देअहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने दिलेला धोबीपछाड शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे नगरच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केल्याचा आरोप शिवसेनेनेचे नेते रामदास कदम यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाविरोधाची भूमिका दुटप्पी आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे

मुंबई - अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने दिलेला धोबीपछाड शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. दरम्यान, नगरच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केल्याचा आरोप शिवसेनेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. त्यामुळे भाजपाला डावलून काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत अहमदनगरची सत्ता मिळवण्याचा डाव शिवसेनेवरच उलटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.   त्रिशंकू निकाल लागलेल्या अहमदनगर महानगपालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र निकालांमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या भाजपाने  कुरघोडीच्या राजकारणात आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर आपले महापौर आणि उपमहापौर नगरच्या महानगरपालिकेत बसवले होते. दरम्यान, अहमदनगरमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीवर प्रतिक्रिया देताना रामदास कदम म्हणाले की, ''अहमदनगरमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाविरोधाची भूमिका दुटप्पी आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.''  दरम्यान, दरम्यान, नगरमध्ये भाजपा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार असतानाही तिथे भाजपाचाच महापौर कसा जिंकला, याची आतली गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रसारमाध्यमांसमोर सांगितली होती. नगरमध्ये शिवसेनेला बिनशर्त पाठिंब्यापाठिंबा देण्यासाठी भाजपा तयार होता. स्थानिक पातळीवर बोलणी सुरू होती.  मीसुद्धा सेनेकडूना ची मागणी झाल्यास पाठिंबा द्या, असे सुचवले.  मात्र महापौर निवडीच्या तीन दिवस आधीपर्यंत शिवसेनेतून कुणीही आमच्याशी बोलण्यास तयार नव्हते. मात्र पाठिंब्यासाठीचा प्रस्तावही शिवसेनेकडून आला नाही. उलट आम्हीच शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांशी बोलावे. रामदास कदमांना आम्ही पाठिंबा देतोय म्हणून सांगा, अशी गळ घालण्यात आली. मात्र पाठिंब्यासाठी शिवसेनेने  प्रस्ताव दिला पाहिजे, असे महाजन यांनी सांगितले. अखेरपर्यंत आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार होतो. अखेरीस शेवटच्या दिवशी महापौर निवडीसंदर्भातील सर्वाधिकार आम्ही स्थानिक नेतृत्वाला दिले, असे फडणवीस म्हणाले होते.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShiv SenaशिवसेनाRamdas Kadamरामदास कदमBJPभाजपा