शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील शिवसैनिक मार खातील, जेलमध्ये जातील पण...; चंद्रकांत खैरेंचा शिंदे गटाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 15:44 IST

संजय शिरसाटांची शिवसेनेत येण्याची इच्छा मान्यच करणार नाही. रात्री कुठल्या धुंदीत ते बोलले असतील माहिती नाही असंही खैरे म्हणाले आहेत.

औरंगाबाद - प्रति शिवसेना भवन बांधून आम्ही शिवसैनिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात येत आहे. मात्र मुंबईतील शिवसैनिक हे सहन करून घेणार नाही यासाठी शिवसैनिकांना मार खावा लागला किंवा जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल मात्र शिवसेना भवनाची कोणी विटंबना केलेले शिवसैनिक कधीच सहन करून घेणार नाही अशा शब्दात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना इशारा दिला आहे. 

चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या आमदारांना खोक्याने पैसे देण्यात आले आहे म्हणून यांना प्रति शिवसेना भवन बांधण्याचे वेड लागले आहे. मात्र शिवसेना भवन हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी बांधले असून ते शिवसैनिकांसाठी मंदिर आहे. यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले याचीही चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. 

तसेच शिंदे गटात जे आमदार गेलेत त्यांना मराठवाड्यात आडवं करण्याचं काम आम्ही करू. अंबादास दानवे यांच्यासोबत मिळून आम्ही एकत्रपणे काम करू. संजय शिरसाटांची शिवसेनेत येण्याची इच्छा मान्यच करणार नाही. रात्री कुठल्या धुंदीत ते बोलले असतील माहिती नाही. १९९२ मध्ये ते शिवसेना सोडून गेले होते. तेव्हा बाळासाहेबांवर एकेरी भाषेत टीका केली होती. त्यांना परत घेण्यात आले त्यावेळी आमचा विरोध होता. आता उद्धव ठाकरेंवर टीका केल्यास शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देऊ असंही खैरे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी आणि हिंदुंना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना भवनाची उभारणी केलीय. शिंदे गटाकडे कोट्यवधी रुपये आलेत. कुठून आले? सगळे पैशाने करायला लागले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन बांधले ते आमच्यासाठी मंदिर आहे. त्याच भवनातून आमदार, खासदार झाले. शिवसेना भवनाची प्रतारणा करू नका. मुंबईतील शिवसैनिकांना हे सहन होत नाही. ते आंदोलन करतील, मार खातील, जेलमध्ये जातील. त्यांची सहनशक्ती संपत आली आहे असंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेना