शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

साधा शिवसैनिक वाढू नये यासाठी युतीत उपमुख्यमंत्रिपदही घेतलं नाही, केसरकरांचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 13:49 IST

मुलांनी पाहिजे तर इतिहास वाचला पाहिजे. हा कोणत्याही राज्याला मोठं करत नाही. कोणीही गोबेल्स नीतीला बळी पडू नका -दीपक केसरकर

सध्या राज्याचं विधीमंडळाचं अधिवेश सुरू आहे. यादरम्यान काही आमदारांकडून शिंदे गटाच्या आमदारांवर टीका केली जात आहे. सध्या राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. अशातच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. साधा शिवसैनिक वाढू नये यासाठी युतीत असताना उपमुख्यमंत्रिपदही घेतलं नाही, असा मोठा आरोप त्यांनी केला. केसरकर यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 

“भाजपनं तुम्हाला उपमुख्यमंत्रिपदही दिलं होतं. एखादा दुसरा मनुष्य, साधा शिवसैनिकही वाढू नये यासाठी युतीत असताना उपमुख्यमंत्रिपदही घेतलं नाही. मी याला साक्षीदार आहे. मुंबईत हे घडत असताना मी वर्षावरही होतो. मुंबईत महापालिकेवर भाजपचं बहुमत येण्याची शक्यता होती, तसं घडलंही असतं. देवेंद्र फडणवीसांनीउद्धव ठाकरेंचा मान राखला. त्यांनी जेव्हा एकमुखी पाठिंबा दिला. मराठी माणसाचा स्वाभिमान कसा राखला जाईल हे पाहिलं, त्यांच्याशी तुम्ही केलेल्याला काय म्हणायचं? मी सर्वसामान्य माणूस आहे आणि मोठ्यांचा आदर ठेवतो, म्हणून मी माझ्या तोंडानं त्या शब्दाचा उच्चार करत नाही. पण काय घडलं हे महाराष्ट्राच्या जनतेला कधी ना कधी कळलंच पाहिजे,” असे केसरकर म्हणाले. 

“बंद खोलीत चर्चा करता, तेव्हा कोणती आश्वासनं देता आणि प्रत्यक्षात काय करता हे कळलं पाहिजे. मुलांनी पाहिजे तर इतिहास वाचला पाहिजे. हा कोणत्याही राज्याला मोठं करत नाही. कोणीही गोबेल्स नीतीला बळी पडू नका,” असंही ते म्हणाले. आम्ही एकही मिनिट थांबत नाही, काम करणारे कार्यकर्ते आहोत. ते काम करताना राजकारण करणार. महाराष्ट्राच्या हिताचं अडीच वर्षात काय केलं? आम्हालाही इश्वरानं जीभ दिली, विचार दिले. आम्ही आमचे विचार लोकांच्या चांगल्यासाठी वापरत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

गोबेल्स नीती यशस्वी होऊ देणार नाही“आमचे मुख्यमंत्री दिवसरात्र काम करतात. त्यांच्यावर तुम्ही टीका करता, वाईट शब्द बोलता. आम्हाला बोलण्याचा अधिकार ज्यांनी निवडून दिलं त्या जनतेला आहे. आपण जर बोललो नाही तर लोकांना खरं वाटतं. त्यामुळे आमचा प्रवक्ता कोणत्या विषयावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला याबद्दल बोलेल. गोबेल्स नीती आहे ती महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही,” असंही केसरकर म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस