शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी साधला वैशाली येडे यांच्याशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 18:28 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून शेतकरी विधवांचे प्रश्न, विदारक स्थिती साहित्याच्या  व्यासपीठावरून निर्भीडपणे मांडल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले.

यवतमाळ- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून शेतकरी विधवांचे प्रश्न, विदारक स्थिती साहित्याच्या  व्यासपीठावरून निर्भीडपणे मांडल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी हा संवाद घडवून आणला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणावरून वाद उद्भवल्यानंतर संमेलनाच्या उद्घाटनासाठी कोणीही पुढे येईना, तेव्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचे ठरविण्यात आले.  त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील राजूर येथील वैशाली येडे यांना हा सन्मान देण्यात आला.  शुक्रवारी दुपारी झालेल्या संमेलनाच्या उद्घाटनात वैशाली येडे यांनी शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे प्रश्न रोखठोकपणे मांडले. त्यांच्या भाषणाचे सर्वत्र कौतूक झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वैशाली येडे यांचे भाषण ऐकले.आज सकाळी त्यांनी ना. संजय राठोड यांच्या मार्फत वैशाली येडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी वैशाली येडे यांच्याशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तुमच्यासारखी भगिनी ही आदिशक्तीचे रूप आहे. संसार मोडून पडल्यानंतरही ज्या खंबीरपणे तुम्ही कुटुंब सावरून, आपली व्यथा समाजासमोर आणली, ती वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. हा संघर्ष समाजासोबतच साहित्यिकांनाही प्रेरणादायी आहे. तुम्ही एकट्या नसून शिवसेना तुमच्या सारख्या भगिनींच्या पाठीशी सदैव आहे. कोणतीही मदत लागली तर संजय राठोड यांच्यामार्फत कळवा,' असे ते म्हणाले. ना. संजय राठोड यांनी वैशाली येडे यांचे अभिनंदन करून एक भाऊ म्हणून आपण सदैव सोबत आहो, असे सांगितले. येडे यांनी यावेळी आपली व्यथा ना.संजय राठोड यांच्यासमोर मांडली. तेव्हा त्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा विश्वास ना. राठोड यांनी त्यांना दिला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, मोहन नंदूरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ