शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

सीमाप्रश्नी शिवसेना रस्त्यावर; कोल्हापूर, सांगलीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:32 IST

मध्यवर्ती बसस्थानक परिसर चौक (सीबीएस) ते दाभोळकर कॉर्नरपर्यंत जोरदार घोषणा देत संतप्त शिवसैनिकांनी निषेध फेरी काढली.

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील, कर्नाटकचे माजी शिक्षणमंत्री बसवराज होरट्टी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यात संताप व्यक्त होत आहे. शिवसैनिकांनी रविवारी कोल्हापुरात कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि भीमाशंकर पाटील यांच्या पुतळ्यांचे दहन केले. त्यामुळे कर्नाटकला जाणारी एस.टी. बससेवादेखील ठप्प होती.मध्यवर्ती बसस्थानक परिसर चौक (सीबीएस) ते दाभोळकर कॉर्नरपर्यंत जोरदार घोषणा देत संतप्त शिवसैनिकांनी निषेध फेरी काढली.कोल्हापुरातील अप्सरा चित्रपटगृहात येथे सुरू असलेल्या ‘अवणे श्रीमनारायण’ हा कन्नड चित्रपट युवासैनिकांनी दुपारी बंद पाडला. कोल्हापुरातून कर्नाटकडे जाणारी एस.टी. बसची सर्व वाहतूक प्रशासनाने शनिवारी रात्री बंद केली. रविवारी दिवसभर ही वाहतूक बंद होती.सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमध्येही कर्नाटक वेदिका-शिवसेना आमने-सामने आले. शिवसेनेने काढलेल्या तिरडी मोर्चा ठिकाणी कर्नाटक रक्षक वेदिका संघटनेचे कार्यकर्तेही दाखल झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही बाजूकडून मोठी घोषणाबाजी करण्यात आली. कऱ्हाडमध्ये दत्त चौकात शिवसैनिकांनी निदर्शने केली.सीमाभागातील मराठी बांधवांना त्रास झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही. महाराष्ट्रामध्ये कर्नाटकातील बांधव सुरक्षित आहेत. त्याचा बोध कर्नाटक सरकारने घ्यावा. वादग्रस्त विधान करणाऱ्या भीमाशंकर पाटील याला कर्नाटक सरकारने अटक करावी.- धैर्यशील माने, शिवसेना खासदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक