शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटप ठरले, पण मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना - भाजपाचे मौन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 21:15 IST

नाही नाही म्हणता म्हणता शिवसेना आणि भाजपाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली आहे.

मुंबई - नाही नाही म्हणता म्हणता शिवसेना आणि भाजपाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. मात्र शिवसेना आग्रही असलेल्या मुख्यमंत्रिपदाबाबत दोन्ही पक्षांनी या संयुक्त पत्रकार परिषदेत मौन बाळगले. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आमचाच अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांनी अनेकदा केली होती. मात्र आज शिवसेना-भाजपामधील जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा केली त्यावेळी मुख्यमंत्रिपदाबाबत दोन्ही पक्षांकडून काही महत्त्वपूर्ण घोषा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र मुख्यमंत्रिपदाच उल्लेखही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी या संयुक्त पत्रकार परिषदेत केला नाही. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि भाजपामध्ये पडद्याआड नेमक्या काय वाटाघाटी झाल्या याबाबतचा संभ्रम वाढला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीची औपचारिक घोषणा आज झाली. युतीच्या घोषणेबरोबरच दोन्ही पक्षांमधील जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणाही झाली आहे. या फॉर्म्युल्यानुसार लोकसभा निवडणुकीत भाजपा 25 तर शिवसेना 23 जागांवर लढणार आहे. तर विधानसभेमंध्ये जागावाटपाचा 50-50 चा फॉर्म्युला दोन्ही पक्षांनी मान्य केला असून, मित्रपक्षांना ठरावीक जागा देऊन उर्वरित जागांचे दोन्ही पक्षांमध्ये निम्म्या निम्म्याने वाटप होणार आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा