शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Kirit Somaiya: संजय पांडे उद्धव ठाकरेंचा नोकर आहे का? जखमी किरीट सोमय्यांचा वांद्रे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 23:20 IST

Shiv Sainiks attack Kirit Somaiya: वांद्रे पोलीस ठाण्याकडे भाजपाचे नेते आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा येण्यास निघाले आहेत. कार्यकर्त्यांनाही बोलविण्यात आले आहे. यामुळे पोलिसांवरील दबाव आता वाढू लागला आहे. 

जोवर माझ्यावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होत नाही, तोवर मी पोलीस ठाण्यासमोरून हलणार नाही, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांच्या हनुवटीला दुखापत झाली आहे. 

Shiv Sainiks attack Kirit Somaiya Video: मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांचा हल्ला; चेहऱ्यावरून रक्त ओघळू लागले

किरीट सोमय्या या प्रकारानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचले असून तिथे डीसीपी देखील पोहोचले आहेत. तसेच भाजपाचे कार्यकर्तेही जमा होऊ लागले आहेत. किरीट सोमय्या हे राणा यांच्या भेटीसाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यामध्ये दगड आणि बाटल्या फेकण्यात आला. यामुळे कारची काच फुटली आणि ती किरीट सोमय्यांच्या चेहऱ्याला आणि हाताला दुखापत झाली. 

 

या साऱ्या प्रकरणावर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय पांडे उद्धव ठाकरेंचा नोकर आहे का, हा पोलीस कमिशनर. शेकडो गुंड पोलीस ठाण्याच्या आवारात घुसतात खुनाचा प्रयत्न करतात. माझ्यावर तीनवेळा हत्येचा प्रयत्न झाला. पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, शिवसैनिकांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करा, तोवर मी इथून जाणार नाही, असे ते म्हणाले. वांद्रे पोलीस ठाण्याकडे भाजपाचे नेते आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा येण्यास निघाले आहेत. कार्यकर्त्यांनाही बोलविण्यात आले आहे. यामुळे पोलिसांवरील दबाव आता वाढू लागला आहे.  

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याShiv Senaशिवसेनाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपा