शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

'जो रामाचा नाही, तो कामाचा नाही'; महा विकास आघाडीवर नाराज शिवसैनिकाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 09:00 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युती झालेली असली तरीही मतदारसंघ सोडण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नव्हते. Maharashtra Government:

मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष कालपर्यंत शिगेला पोहोचला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रपदाचा राजीनामा दिला. यानंतर अवघ्या तीन दिवसांचे फडणवीस सरकार गडगडले. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मात्र, ही आघाडी शिवसैनिकांना फारशी आवडली नसल्याचे दिसत आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युती झालेली असली तरीही मतदारसंघ सोडण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नव्हते. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराचा तर भाजपाने शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास नकार दिला होता.  काही शिवसैनिकांनी सामुहिक राजीनामेही दिले होते. मात्र, निकालानंतर वेगळीच गणिते आकारास आली असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करत आहेत. नेमका हाच मुद्दा काही शिवसैनिकांना आवडलेला नाही. यामुळे रमेश सोळंकी नावाच्या शिवसैनिकाने मंगळवारी रात्री पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याची माहिती त्याने ट्विटरवर दिली आहे.

सोळंकी याने ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाचा राजीनामा देत आहे. माझा अंतरात्मा आणि वाचारधारा काँग्रेससोबत काम करण्याची परवानगी देत नाही. गेल्या काही दिवसांपासून माझे मत जाणून घ्यायचे होते. आता मला माझी भूमिका मांडायची आहे. जो माझ्या श्रीरामाचा नाही (काँग्रेस), तो माझ्या काही कामाचा नाही आहे. पुन्हा एकदा आदित्या ठाकरे यांचे धन्यवाद. तुमच्यासोबत काम करण्यात आनंद मिळाला. 

यानंतर पुन्हा एक ट्विट करत सोळंकी यांनी म्हटले की, मी कोणत्याही पदाची किंवा तिकिटाची मागणी केलेली नाही. महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी आणि मुख्यमंत्री बनविल्याबद्दल शिवसेनेला शुभेच्छा. माझा अंतरात्मा आणि वाचारधारा काँग्रेससोबत काम करण्याची परवानगी देत नाही. माझे पद, माझा पक्ष आणि सहकाऱ्यांसाठी हे योग्य नाही. 

असे सांगताना त्यांनी हा निर्णय घेणे खूप कठीण जात असल्याचे म्हटले आहे. जेव्हा जहाज बुडायला लागते तेव्हा पहिले उंदीर उड्या मारायला लागतात. पण मी माझा पक्ष सर्वोच्च उंचीवर असताना सोडत असल्याचेही सोळंकी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे