शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साईंच्य्या काकड आरतीच्या वेळेत बदल; १ मार्चपासून बदल अंमलात येणार, जाणून घ्या नव्या वेळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 20:13 IST

शेजारतीची वेळ रात्री १० वाजता; संस्थानच्या सीईओंनी दिली माहिती

शिर्डी : साईंच्या काकड आरतीची वेळ पाऊण तास उशिराने व शेजारतीची वेळ अर्धा तास आधी घेण्याचा निर्णय साईसंस्थान व्यवस्थापनाने घेतला आहे. या नवीन बदलामुळे काकड आरती सकाळी सव्वा पाच वाजता तर शेजारती रात्री १० वाजता होईल. यामुळे दिवसभरात दर्शनाची वेळ सव्वा तासाने कमी होणार आहे. १ मार्चपासून (महाशिवरात्री) हे नवीन बदल अंमलात येणार आहेत, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.दर्शनाची वेळ वाढवून गर्दी व्यवस्थापनासाठी तत्कालीन अध्यक्ष स्व. जयंत ससाणे यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापनाने ६ एप्रिल २००८ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काकड आरती पाऊण तास आधी पहाटे साडे चार वाजता, तर शेजारती अर्धा तास उशिराने रात्री साडे दहा वाजता घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे दिवसभरातील दर्शनाची वेळ सव्वा तासाने वाढली होती. अनेक भाविक रात्री शेजारतीनंतर जेवतात, आरती होईपर्यंत हॉटेल व प्रसादालय बंद झालेले असते. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते. याशिवाय काकड आरतीला खूपच लवकर तीन-साडे तीन वाजताच मंदिरात जावे लागते. यामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर आरत्यांची वेळ पूर्ववत करावी, अशी मागणी भाविक व ग्रामस्थांकडून झाली होती. या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापनाने आरतीच्या वेळा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविक व ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.जमावबंदी शिथिल व्हावीदर्शनाची वेळ कमी झाल्याने भाविकांना दर्शनासाठी घाई करू नये. त्यांना काच काढून समाधीला हस्तस्पर्श करून दर्शनाचा आनंद घेऊ द्यावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या कोविडमुळे रात्रीची जमावबंदी आदेश असल्याने सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंतच मंदिराची वेळ आहे. यामुळे काकड आरतीला व शेजारतीला भाविकांना उपस्थित राहता येत नाही. ही जमावबंदी लवकरात लवकर उठवावी व गुरुवारची शेजारती सुरू करावी, अशीही मागणी भाविकांमधून होत आहे.