शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

शंकराचार्यांवर शिर्डीत गुन्हा

By admin | Updated: June 25, 2014 18:51 IST

शिर्डी : साईबाबांच्या देवत्वावर व ते हिंदू-मुस्लिमांचे प्रतीक असण्यावर घेतलेल्या आक्षेपाने संतप्त झालेल्या शिर्डीकरांनी शंकराचार्यांच्या विरोधात शिर्डी ठाण्यात गुन्हा दाखल केला.

शिर्डी : द्वारकेच्या शंकराचार्यांनी साईबाबांच्या देवत्वावर व ते हिंदू-मुस्लिमांचे प्रतीक असण्यावर घेतलेल्या आक्षेपाने संतप्त झालेल्या शिर्डीकरांनी मंगळवारी या शंकराचार्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान या संदर्भात साईनगरीत दुसऱ्या दिवशीही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या़शिर्डीतील सर्वधर्मीयांच्या वतीने नितीन कोते यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली़ त्यानुसार शिर्डीचे पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्यावर कलम २९५-अ, २९८ नुसार (धार्मिक भावनांचा अप्रचार करून तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करणे) अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे़ यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते, कमलाकर कोते, शिवाजी गोंदकर, विजय कोते, जमादारभाई शेख, मौलाना असगरअली, दत्तात्रय कोते, विजय जगताप, निलेश कोते, गफ्फारखान पठाण, विष्णू थोरात, कैलास कातोरे, हमीदभाई, सचिन कोते, गणीभाई पठाण, मंगेश त्रिभुवन, सचिन चौघुले आदी उपस्थित होते़यावेळी मंदिराचे पुजारी बाळासाहेब जोशी, सचिन तांबे, सुधाकर शिंदे, अ‍ॅड़ शिवाजी सजन, रवींद्र कोते, ताराचंद कोते, मिलिंद कोते, वेणुनाथ गोंदकर, दीपक वारूळे, भरत चांदोरे आदींची उपस्थिती होती़ संस्थान कर्मचाऱ्यांच्या वतीने तुषार शेळके यांनी शंकराचार्यांच्या वक्तव्याचा निषेध केला़ (वार्ताहर)एकात्मतेचे दर्शनशंकराचार्यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सकाळी सर्वधर्मीय शिर्डीकर एकत्र आले़ एका बाजूने हिंदू, तर दुसऱ्या बाजूने मुस्लिम बांधवांनी धरलेल्या साईप्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली़यावेळी या मिरवणुकीसमोर घंटानाद करण्यात आला़ यानंतर मंदिर परिसरात या मिरवणुकीचे रुपांतर निषेध सभेत झाले़ यावेळी जमादारभाई व गणीभाई पठाण यांनी साईबाबा मुस्लिमांच्या हृदयात असल्याचे सांगितले़ बाबांनी सर्व धर्मातील रूग्णांवर उपचार केले, सर्व धर्माचे लोक त्यांना परमेश्वर मानतात.मानसिक रूग्ण असल्याचा दावाअनेकांनी हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचा दावा करत शंकराचार्य हे मानसिक रुग्ण असून त्यांच्या उपचारासाठी शहरात भिक्षा झोळी फिरवून निधी उभारण्याचे आवाहन केले़पोलीस महानिरीक्षकांना निवेदनइन्स्पेक्शनच्या निमित्ताने शिर्डीत आलेले नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांचीही भेट घेऊन सर्वधर्मीय शिर्डीकरांनी त्यांना निवेदन दिले़ यावेळी साळुंके यांनी शिर्डीतील जातीय सलोख्याचे कौतुक करत, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अपप्रवृत्तींपासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला़ याप्रसंगी पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता ठाकरे आदी उपस्थित होते़