शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

शायनिंग नागपूर

By admin | Updated: August 20, 2014 01:10 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ आॅगस्ट रोजीच्या दौऱ्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पंतप्रधान ज्या ज्या मार्गाने जातील तेथे ‘स्वच्छ नागपूर’ निर्माण करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी युद्धस्तरावर तयारी नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ आॅगस्ट रोजीच्या दौऱ्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पंतप्रधान ज्या ज्या मार्गाने जातील तेथे ‘स्वच्छ नागपूर’ निर्माण करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते कस्तूरचंद पार्कपर्यंतचा रस्ता चकाचक करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या मार्गावरील खड्ड्यांचे झटके पंतप्रधानांना लागू नये यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. मंगळवारी महानगरपालिकेकडून कस्तूरचंद पार्कजवळील मॉरिस कॉलेजसमोरील मार्ग, झीरो माईल चौक, मॉरिस कॉलेज टी पॉईंट, रहाटे कॉलनी चौक, नीरी समोरील मार्ग, सोमलवाडा इत्यादी ठिकाणचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे छत्रपती चौक उड्डाण पूल आणि शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पुलावरील ‘स्ट्रीट लाईट्स’ सुधारण्याचे काम सुरू होते. विमानतळाच्या कार्गो टर्मिनलच्या ‘व्हीआयपी’ प्रवेशद्वाराहून समोर निघणाऱ्या रस्त्याच्या साफसफाईचे काम जोरात सुरू होते. या मार्गाच्या आजूबाजूला उगवलेले गवत व झुडुपे साफ करण्यात येत आहे.जाहिराती हटाओ मोहीमविमानतळ मार्गाच्या रस्ता दुभाजकांवर लागलेले इलेक्ट्रॉनिक होर्डिंग्सच्या ‘बॉक्स’मध्ये विस्फोटक लपविण्याची शक्यता लक्षात घेता येथील लाईट व जाहिराती काढण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. या जाहिराती मंगळवारपर्यंत काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.‘होर्डिंग्ज’ची गर्दीपंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त एकीकडे वर्धा मार्गावर स्वच्छता मोहीम सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या स्वागतासाठी ‘होर्डिंग्स’ची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील मोठ्यांपासून ते लहान नेत्यांपर्यंत अनेकांच्या नावांचे ‘होर्डिंग्स’ वर्धा मार्ग तसेच कस्तूरचंद पार्कच्या परिसरात लागण्यास सुरुवात झाली आहे.जॅमर आले अन् बुलेटप्रूफ वाहनेही पंतप्रधानांचा नागपूर-मौदा दौऱ्याची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी सुरक्षा यंत्रणेची धावपळ गतिमान होत आहे. या पार्श्वभूमीवर, पीएमओ मधून तीन तर, मुंबईहून दोन विशेष बुलेटप्रूफ वाहने नागपुरात पोहचली आहे. जॅमरही आले आहेत. कस्तूरचंद पार्कवरील कार्यक्रमासाठी बंदोबस्ताची तयारी पोलीस आयुक्त के. के. पाठक तर, मौद्याच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग करीत आहेत. मात्र, बंदोबस्ताची व्यूहरचना आखण्याचे सर्वाधिकार विशेष सुरक्षा पथकाच्या (एसपीजी) अधिकाऱ्यांनाच आहेत. त्यासाठी डीआयजी सुधांशू श्रीवास्तव आपल्या सहकाऱ्यांसह सोमवारीच नागपुरात आले आहेत. नागपूर आणि मौदा अशा दोन्ही ठिकाणी एसपीजींचे दोन वेगवेगळे पथक पंतप्रधान मोदी यांच्या सभोवताल सुरक्षा कवच उभारतील. स्थानिक विशेष सुरक्षा पथकाचे (एसपीयू) अधिकारी त्यांच्या मदतीला आहेत. या अधिकाऱ्यांनी आज मौदा तसेच नागपुरातील कार्यक्रमस्थळ आणि मोदी यांच्या भेटीची तीन संभावित स्थळांची तसेच आजूबाजूच्या परिसरातही कसून तपासणी करवून घेतली आहे. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला (बीडीडीएस) या स्थळांवर नेमण्यात आले आहे. मोदी यांना हेलिपॅड (मौदा) तसेच विमानतळावरून कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी दिल्लीहून पीएमओची तीन विशेष (बुलेटप्रूफ) वाहने तर, मुंबईहून दोन विशेष वाहने नागपुरात बोलवून घेण्यात आली आहेत. तीन जॅमरही पोहचले आहेत. आज त्यांची ट्रायलही घेण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान अतिशय कडक बंदोबस्त राहाणार आहेत. साधारणत: ५ हजार पोलीस कर्मचारी आणि पाचशेवर पोलीस अधिकारी बंदोबस्त सांभाळणार आहेत. पंतप्रधानांच्या आगमनापूर्वीच विमानतळ ते कस्तूरचंद पार्क हा मार्ग २१ आॅगस्टला दोन्ही बाजूने सिल करण्यात येईल. मार्गावरच्या दोन्ही बाजूला लागलेल्या टपऱ्या, छोटी दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहेत. विमानतळ ते कस्तूरचंद पार्क हा मार्ग गुळगुळीत करण्याचे काम आज दुपारपासून सुरू झाले आहे. आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडस् लावण्यात येणार आहे.विमानतळावर ‘हायअलर्ट’पंतप्रधानांचा दौरा लक्षात घेता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. देशातील संवेदनशील विमानतळांमध्ये नागपूर विमानतळाचा समावेश आहे. विमानतळाच्या ‘एअर साईड’मध्ये ‘सीआयएसएफ’चे (सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स) जवान निगराणी करत आहेत. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात ‘बीसीएस’कडूनदेखील (ब्यूरो आॅफ सिव्हील एव्हिएशन सिक्युरिटी) निर्देश प्राप्त झाले. विशेष सतर्कता घेण्याच्या सूचना असल्याने प्रवासी व त्यांच्या सामानाची कडक तपासणी करण्यात येत आहे. विमान कंपन्यांकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. ‘डीएफएमडी’तून (डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर) गेल्यानंतर ‘बोर्डिंग’च्या वेळी ‘हँड हेल्ट डिटेक्टर’नेदेखील प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. सुरक्षा लक्षात घेता पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळी दर्शक दालन बंद ठेवण्यात येईल. विमानतळाच्या आत ‘सीआयएसएफ’च्या ‘पेट्रोलिंग’सोबतच शहर पोलिसांचा पहारा असेल. भाजपची जय्यत तयारीसभा सुरळीत पार पडावी, यासाठी भाजपचे नियोजन सुरू आहे. कार्यक र्र्त्यात उत्साहाचे वातावरण असून प्रत्येक मंडळ शाखेत बैठका घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक मंडळातून सभेसाठी किमान १००० कार्यकर्ते आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. सोबतच विधानसभा क्षेत्रनिहाय नियोजन सुरू आहे. कार्यक र्त्याना व्हीआयपी पासेसचे वाटप सुरू आहे. कुणी कुठे व कोणत्या रांगेत बसावे यासाठी पासेस वाटप सुरू आहे. आयुक्तांनी घेतला आढावाया पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरू असलेल्या तयारीचा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी मंगळवारी आढावा घेतला. सभेला होणारी गर्दी विचारात घेता सुरक्षा यंत्रणा, आरोग्य सेवेचा आढावा घेण्यात आला. तसेच टेलिफोन व विमानतळावरील व्यवस्थेची माहिती घेतली. जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मनपा आयुक्त श्याम वर्धने, नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे, जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंग यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मोदी यांच्या सभेला होणारी गर्दी विचारात घेता सभा सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. सभेची तयारी, कस्तूरचंद पार्क परिसरातील पार्किंग सुविधा, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेवून अनुप कुमार यांनीअधिकाऱ्यांना सूचना केल्या.