शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंचा शेवटपर्यंत सस्पेन्स अन् ज्योती वाघमारेंना मिळाली संधी, रोहित टिळक उमेदवारी अर्ज भरणार होते, पण ट्विस्ट कुठे आला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 05:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असे मानले जात असतानाच उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असे मानले जात असतानाच उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सकाळपासूनच ‘कहानी में ट्विस्ट’ आणला. त्यांच्या वाट्याला एकच जागा आलेली असताना दुसरा उमेदवार पुण्याचे रोहित टिळक यांच्या रुपाने उतरविण्याची तयारी त्यांनी केली. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे चित्रही निर्माण झाले होते. पण, शेवटी टिळक यांनी अर्ज भरलाच नाही. 

शिंदेसेनेच्या सगळ्या हालचाली करत होते खा. श्रीकांत शिंदे! उदय सामंत, शंभूराज देसाई आणि अन्य मंत्र्यांसह एकनाथ शिंदे यांच्या विधानभवनातील दालनात त्यांनी बंदद्वार चर्चा केली. नंतर खा. शिंदे विधानभवनातून बाहेर जाण्यासाठी पायऱ्यांवर आले तेव्हा राष्ट्रवादी (अजित पवार)चे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे पत्रकारांशी चर्चा करत उभे होते. पटेल यांनी, ‘काय आपला उमेदवार ठरला का’ अशी विचारणा खा. शिंदे यांना केली तेव्हा, अजून नाही, जरा वाट पाहा. पण, सामान्य शिवसैनिकालाच संधी दिली जाईल, असे  म्हणत ते बाहेर पडले. 

इकडे विधानभवनात उत्सुकता ताणली गेली. शिंदेसेना दुसरा उमेदवार देणार, अशी चर्चा सुरू झाली. राहुल शेवाळेंचे नाव नक्की झाले, अशीही चर्चा पसरली. काही वेळाने उपमुख्यमंत्री शिंदे विधानभवनात आले, पत्रकारांकडे पाहून म्हणाले, ‘आम्ही दोन उमेदवार देणार’... यामुळे पुन्हा तर्क-वितर्कांना उधाण आले. शिंदेंनी दुसरा उमेदवार दिला तर काय होणार? शरद पवार अडचणीत येतील का? अशा शंकाही लगोलग आल्याच. 

मना बिड्डा खासदार आया...ज्योती वाघमारे यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिल्याचे कळताच सोलापुरातील शिंदेसेनेच्या वतीने आणि मोची समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. ‘मना बिड्डा खासदार आया..’ या शब्दात समर्थकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राहुल शेवाळे, संजय निरुपम मागे पडले माजी खासदार राहुल शेवाळे यांनाच शिंदेसेना उमेदवारी देईल, असे मानले जात असतानाच चित्र अचानक बदलले. सोलापूरच्या डॉ. ज्योती वाघमारे यांना लॉटरी लागली.शेवाळे, माजी खा. संजय निरुपम, नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार गजानन कीर्तीकर खासदारकीसाठी इच्छुक होते. शेवाळे यांच्या नावाला पक्षातीलच काही नेत्यांनी विरोध केला, अशी माहिती आहे. मुंबईतील इच्छुक अधिक असल्याने बाहेरच्या व्यक्तीला संधी देऊन शिंदे यांनी अंतर्गत नाराजीवर तोडगा काढला. शेवाळे हे अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. त्यांना संधी नाकारताना याच समाजातील वाघमारे यांना संधी दिली. 

फडणवीस-शिंदे चर्चा अन्...दुसरा उमेदवार म्हणून राहुल शेवाळे किंवा रोहित टिळक यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी केली होती. रोहित हे लोकमान्य टिळक यांचे खापरपणतू आहेत. मात्र, दुसरा उमेदवार दिला तरी त्याला निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव कठीण जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्रीफडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वानेही घेतली.शिंदे यांच्याकडे अतिरिक्त २० मते होती आणि दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी आणखी १६ मते हवी होती. शिंदे यांनी दुसरा उमेदवार दिला असता तर शरद पवार यांच्या पाठीशी मविआ भक्कमपणे उभी राहिली असती व त्यांचे संख्याबळ हे ४६ इतके होते. त्यामुळे भाजपशी चर्चेअंती शिंदे यांनी दुसरा उमेदवार दिला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde's Suspense Ends, Jyoti Waghmare Gets Rajya Sabha Opportunity

Web Summary : Eknath Shinde created suspense over a second Rajya Sabha candidate. Despite considering Rohit Tilak, Jyoti Waghmare secured the nomination. Internal opposition and coalition dynamics influenced the final decision, averting a potential contest with Sharad Pawar.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभाEknath Shindeएकनाथ शिंदे