शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"शिंदेंची शिवसेना ही जत्रेतली, त्यांचे तंबू उठण्याची वेळ आलीय’’ संजय राऊतांचा निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 11:57 IST

Sanjay Raut Criticize Eknath Shindes Shiv Sena: शिवसेनेच्या वर्धापनाची तारीख जवळ आल्याने शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेच्या वर्धापनाची तारीख जवळ आल्याने शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदेंचीशिवसेना ही जत्रेतील खोटी शिवसेना आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे तंबू उठण्याची वेळ आली आहे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.  

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, तुम्ही कधी जत्रेमध्ये गेलाय का. गावच्या जत्रेमध्ये असे तंबू असतात. या तंबूंमध्ये खोटा चंद्र, खोटी मर्सिडीज गाडी असते. तिथे लोक चंद्रावर बसून फोटो काढतात. नंतर आम्ही चंद्रावर बसलो म्हणून सांगतात. तशी ही खोटी शिवसेना आपल्या मागे लावून हे लोक फोटो काढताहेत. पण बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. बाकी ज्यांना खोट्या चंद्रावर बसून, खोट्या मोटारसायकलवर बसून फोटो काढायचे आहेत ते तिकडे आहेत. ती जत्रेतली खोटी शिवसेना आहे. बाकी जत्रा संपली की जत्रेतले तंबू उठतात. आता जत्रा संपण्याची वेळ आली आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

दरम्यान, गतवर्षी १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी बंड केलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे अनेक नेते आणि आमदार शिंदेंसोबत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर अखेर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली होती. तसेच महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना