शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

स्वबळावर लढण्याची घोषणा, तरी ‘राज’ मागण्यांना शिंदेंचा प्रतिसाद

By यदू जोशी | Updated: August 4, 2024 09:44 IST

अजित पवार गटाशी संघर्ष तरी पायघड्याच; विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची तयारी, एक सर्वेक्षण पूर्ण, दुसरे करणार सुरू

यदु जोशी -मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच विधानसभेच्या २२५ ते २५० जागा लढविण्याचा निर्णय घेत ते महायुतीला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज यांच्याशी विविध विषयांवर केवळ चर्चाच केली नाही तर त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद देत निर्णयही घेतले. राज ठाकरे यांनी अलीकडेच मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना कोणत्याही परिस्थितीत मी यावेळी मनसेला सत्तेत बसविणार असे जाहीर केले होते. लोकसभा निवडणुकीत राज यांनी नरेंद्र मोदी यांना आणि पर्यायाने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. काही उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी सभादेखील घेतल्या होत्या. भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी घेतेलल्या सभेचा त्यात समावेश होता.मात्र, विधानसभा निवडणुकीला तीन महिने शिल्लक असताना राज यांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी एक सर्वेक्षण पूर्ण केले आणि दुसरे सर्वेक्षण ते आता सुरू करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात उमेदवार लढविण्याची रणनीती ते आखत आहेत. त्यांच्या उमेदवारांचा महायुतीला फायदा होईल की नुकसान याबद्दल मतमतांतरे असली तरी उद्धव ठाकरेंची मते आपल्याकडे वळविण्यात राज यांना जितके यश येईल, तितका महायुतीला फायदाच होईल, असे म्हटले जात आहे. 

वर्षा निवासस्थानी विविध मागण्यांवर चर्चाराज ठाकरे यांच्याबद्दल काही विधाने केल्यामुळे अजित पवार गटाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांची कार मनसेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यात फोडली होती. त्यावरून अजित पवार गट विरुद्ध मनसे असे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरेंना प्रतिसाद देत वर्षा निवासस्थानी शनिवारी सकाळी विविध मागण्यांवर चर्चा केली आणि मुंबईतील प्रश्नांसह पुण्याचे प्रश्न आणि बीएएमएस विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही निर्णय घेतले. महायुतीतील एका घटक पक्ष (अजित पवार गट) आणि मनसे यांच्यात तणाव निर्माण झाला असताना शिंदे यांनी मात्र राज यांच्याशी चर्चाच केली नाही, तर काही निर्णयही त्यांच्या मागण्यांवर घेतले. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी रेल्वेशी संबंधित मागणी केली असता मुख्यमंत्र्यांनी बैठकीतूनच विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना फोन लावला. बोदवड (जि.जळगाव) येथील पंतप्रधान आवास योजना रखडल्याचे मनसेचे माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी निदर्शनास आणून देताच ‘अडथळे लगेच दूर करा’ असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

समस्यांची घेतली दखल- मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. तिथे आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत.- अशावेेळी वरळी बीडीडी चाळीच्या, तसेच पोलिसांच्या घरांच्या प्रश्नांबाबत आणि एसआरए प्रकल्पांविषयीच्या समस्यांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली.- एसआरएबाबत संबंधित विकासकावर कारवाई करा, असेही निर्देश दिले. राज यांच्यासोबतच्या बैठकीवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही शिंदे यांनी बोलावून घेतले होते.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाvidhan sabhaविधानसभा