शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाचे आमदार थेट शिवतीर्थावर, राज ठाकरेंसोबत तासभर चालली चर्चा; काय झालं बोलण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 13:48 IST

"राज ठाकरे आणि आमचे आधीपासूनच एक वेगळे नाते आहे. शिवसेना प्रमुखांच्या सभा मराठवाड्यात होत होत्या, तेव्हा राज ठाकरे त्यांच्यासोबतत आवर्जून असायचे. ज्या प्रमाणे शिवसेनाप्रमूख म्हणायचे की मनभेद नसावेत. तसेच त्यांचे आणि आमचे मनभेत कुठेही नाहीत."

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज (शनिवार) मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थावर सदिच्छा भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याचे समजते. या संदर्भात बोलताना, राज ठाकरे आणि आमचे आधीपासूनच एक वेगळे नाते आहे. त्यांना भेटण्याची आणि गप्पा मारण्याची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती. मी कसल्याही प्रकारचा मेसेज आणला नाही. हे वरिष्ठ पातळीवर होत असते, असे आमदार शिरसाट यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, राज ठाकरे महायुतीत आले तर, रेड कार्पेट टाकणाऱ्यांमध्ये आम्ही असणार, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.

राज यांच्या सोबत झालेल्या भेटीसंदर्भात एबीपी माझाशी बोलताना आमदार शिरसाट म्हणाले, "राज ठाकरे आणि आमचे आधीपासूनच एक वेगळे नाते आहे. शिवसेना प्रमुखांच्या सभा मराठवाड्यात होत होत्या, तेव्हा राज ठाकरे त्यांच्यासोबतत आवर्जून असायचे. ज्या प्रमाणे शिवसेनाप्रमूख म्हणायचे की मनभेद नसावेत. तसेच त्यांचे आणि आमचे मनभेत कुठेही नाहीत. राज ठाकरे यांना भेटण्याची आणि गप्पा मारण्याची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती. मात्र फारशी राजकीय चर्चा झाली नाही. जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला."

"मी कसल्याही प्रकारचा मेसेज आणला नाही. हे वरिष्ठ पातळीवर होत असते. माझ्या सारख्याच्या माध्यमाने काही मेसेज जाईल, अशी कल्पनाही करू शकत नाही. त्यांना भेटणे, त्यांच्यासोबत चहा घेणे आणि गत काळात घडलेल्या घटनांना उजाळा देणे, एवढंच आज झालं," असे शिरसाट यांनी सांगितले.

तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकणाऱ्यांमध्ये आम्ही असणार -महायुतीत राज ठाकरे यांच्या येण्यासंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, "राज ठाकरे यांना पहिल्यापासूनच सांगत आहोत की, साहेब आपण आलं पाहीजे. तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकणाऱ्यांमध्ये आम्ही असणार आहोत आणि हे उघडपणे, सर्वांसमोर बोललो आहे. ते आलेच तर त्यांच्या ताकदीचा महायुतीला फायदाच होईल, ताकद वाढेल आणि जागा निवडून येतील." 

कधीपर्यंत निर्णय होणार? काय म्हणाले राज ठाकरे? यावर बोलताना शिरसाट म्हणाले, "त्यांचे सर्व लक्ष सध्या त्यांच्या मेळाव्याकडे आहे. माझी जी मळमळ आहे, मी मेळाव्यात काढेन. त्यानंतर मला काय बोलायचे आहे, ते त्या मेळाव्यात तर बोलेनच, नंतर मी माझा निर्णय घेई, असे त्यांनी म्हटले आहे. पण आज त्यांच्या मनात काय सुरू आहे हे माहीत नाही. पण त्यांनी यावे, असे माझे वैयक्तिक मत आहे. 

  

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाAam Admi partyआम आदमी पार्टी