शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"एखाद्या नवरीनं घर सोडावं तसं उद्धव ठाकरेंनी 'वर्षा' बंगला सोडताना सोंग घेतलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 10:18 IST

कामाचं बाजूला राहिलं पण अडीच वर्ष उद्धव ठाकरे कुणाला भेटले नाही असं शिंदे गटाचे मंत्री भुमरे म्हणाले.

औरंगाबाद - ज्या दिवशी वर्षा बंगल्यातून बाहेर पडायचं तेव्हा कोरोना झाला होता, आदल्यादिवशी मास्क घातलं होते. मात्र एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी जाते तसं सोंग उद्धव ठाकरेंनी केले. घराबाहेर रडारडी, पळापळी झाली अशा शब्दात शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. 

संदीपान भुमरे म्हणाले की, कामाचं बाजूला राहिलं पण अडीच वर्ष उद्धव ठाकरे कुणाला भेटले नाही. आपण फक्त त्यांना टीव्हीत पाहिले. आम्हीपण बऱ्याच वेळा टीव्हीत पाहिले. टीव्ही सुरू केली की उद्धव ठाकरे आम्हाला दिसायचे. टीव्ही बंद केली की दिसत नव्हते. कोरोनाचं एवढं मोठं संकट आले उद्धव ठाकरे एकाही जिल्ह्यात गेले नाहीत. आदित्य ठाकरे एकाही जिल्ह्यात फिरकले नाहीत. मात्र आता त्यांना सगळीकडे जायला वेळ आहे. पण सत्ता होती तेव्हा त्यांना कुठे जायला वेळ नव्हता असं त्यांनी सांगितले. 

'त्याने'च ठाकरेंना CMपदावरुन हटवण्याबाबत गळ घातली होतीशिवसेनेच्या निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रेला उत्तर म्हणून शिंदे गटाकडून हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेतील एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटातील नेते आणि राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मोठा गौप्यस्फोट केला. शिंदे गटातून शिवसेनेत परतलेले आमदार नितीन देशमुख यांनीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होण्याची गळ घातली होती असं त्यांनी म्हटलं. 

ठाण्यावरून सुरतकडे जात असताना कारमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख यांच्यासह मी स्वत: होतो, असे संदिपान भुमरे यांनी म्हटले. त्यावेळी नितीन देशमुख यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याची गळ घातली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खेचत तुम्ही स्वत: मुख्यमंत्री व्हा, असे देशमुखांनी एकनाथ शिंदेंना म्हटले होते, असे भुमरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे आमदारांना सोडा, कॅबिनेट मंत्र्यांनादेखील भेटत नव्हते. लाजेखातर पक्षप्रमुख आम्हाला भेटतात असे खोटे बोलावे लागत होते, अशी खंत भुमरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSandeepan Bhoomraसंदीपान भुमरे