शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

“अजितदादांनी आमच्यासोबत यावे, ते कार्यक्षम नेते पण राष्ट्रवादीत...”; दीपक केसरकरांची खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 12:04 IST

Deepak Kesarkar Offer To Ajit Pawar: अजित पवारांबद्दल अतिशय आदर आहे. अजितदादांनी सरकारमध्ये यावे, ही आमची अपेक्षा आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

Deepak Kesarkar Offer To Ajit Pawar: आताच्या घडीला राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष, नेते कंबर कसून तयारीला लागले आहेत. विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता अजित पवार यांनी आमच्यासोबत यावे, अशी खुली ऑफर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. ते मीडियाशी बोलत होते. 

अजित पवार यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे. दादा विरोधी पक्षाचे नेते, जबाबदार नेते आहेत. त्यांनी अशी वक्तव्ये करु नये. संजय राऊत यांच्यासारखे लोक रोज बोलतात त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र दादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्याने घेते. सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. राज्यात दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्याला दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. 

राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यासोबत काय होतेय हे सर्वांना माहिती आहे

अजित पवार यांनी सरकारमध्ये यावे, ही आमची अपेक्षा आहे. दादा हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातील जनतेला झाला पाहिजे. राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यासोबत काय होतेय हे सर्वांना माहिती आहे, असे सांगत दीपक केसरकर यांनी थेट खुली ऑफर दिली. दुसरीकडे, आपल्याच माणसाला धमकी द्यायला लावतात. ही कशी लोक आहेत, यांचे बुरखे आपोआप फाटले ‌जात आहेत. ते किती घाणेरड बोलतात हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यांच्या पक्षाने नवीन काहीतरी चॅनल सुरु केले आहे. त्यात राऊतांना घेतले नाही. सुषमा अंधारे यांना घेतले आहे. त्या बाळासाहेबांबद्दल काय बोलल्या अन् त्यांना प्रवक्ता केले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. त्यांनी ते विचार सोडले, अशा शब्दात केसरकर शिवसेना ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले. 

दरम्यान, आदित्य ठाकरेंना कोणी अधिकार दिला खोके घेतले म्हणण्याचा? कोर्टाने नोटीस ‌दिली तेथे जाऊन उत्तर द्या. पैशांनी कोणी विकल जात नाही. ते खोट बोलतात, बाळासाहेब नेहमी खर बोलायचे. तरुण असून तुम्ही मंत्रालयात जात नव्हता. पर्यटनमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी कोकणासाठी काय केले? लोकांना भडकावून पोळी भाजून घ्यायची. एकनाथ शिंदे गरजवंताना मदत करणारे आहेत. जे बाळासाहेब करायचे ते शिवसैनिक करत आहेत. पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंना जवळ घ्यायला तयार होते अन् तुम्ही खोट बोलत फिरत आहात, या शब्दांत दीपक केसरकर यांनी हल्लाबोल केला.

 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Ajit Pawarअजित पवार