शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: सत्ताकारणात शिंदे-फडणवीस विसरले! राऊतांवर हक्कभंग तर आणला, पण समिती कुठेय... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 07:11 IST

आधी दाखल झाला हक्कभंग; नंतर स्थापन झाली समिती, सत्तांतराला आठ महिने होऊनही विधिमंडळाच्या समित्याच नाहीत

- दीपक भातुसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  सत्ताधारी पक्षांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला; पण हक्कभंगाची पुढील कारवाई करण्यासाठी हक्कभंग समितीच अस्तित्वात नसल्याचे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच घाईघाईत हक्कभंग समिती स्थापन करण्याची धावपळ सरकार आणि विधिमंडळ स्तरावर सुरू झाली. या समितीवर सर्वपक्षीय आमदारांचा समावेश असल्याने सर्व पक्षांकडून आमदारांची नावे मागवून अखेर समिती स्थापन करण्यात आली.

 राज्यात सत्ताबदल होऊन आठ महिने उलटून गेले तरी विधिमंडळाच्या  कोणत्याही समित्यांची स्थापना करण्यात आलेली नाही. बुधवारी सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) - भाजप सरकारने  संजय राऊत यांच्याविरोधात दोन्ही सभागृहांमध्ये हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्यानंतर या समित्यांची गरज राज्य सरकार आणि विधिमंडळाला वाटू लागली. त्यानंतर तातडीने पाऊले उचलण्यात आली. 

घाईघाईत हक्कभंग समितीची स्थापना संजय राऊत यांच्या हक्कभंगाचा विषय विधिमंडळात आल्यानंतर विधिमंडळाने तातडीने रात्री हक्कभंग समितीची स्थापना केली. या समितीचे अध्यक्ष राहुल कुल, तर सदस्य म्हणून अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नीतेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाट, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, नितीन राऊत, सुनील केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल यांचा समावेश आहे. 

विधिमंडळाच्या ३८ समित्याविधिमंडळाच्या विविध कार्यासाठी ३८ समित्या आहेत. विधिमंडळाच्या कामकाजाची पूर्तता करण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांचा समावेश असलेल्या या समित्या स्थापन केल्या जातात. या समित्या सरकारवर अंकुश ठेवण्याबरोबर जनहितासाठीही महत्त्वाच्या असतात. लोकहिताचा एखादा विषय घेऊन त्यावरही या समित्या काम करतात. 

या आहेत प्रमुख समित्याnलोकलेखा समितीnविशेषाधिकार समिती nसार्वजनिक उपक्रम समितीnअंदाज समितीnअनुसूचित जाती कल्याण समितीnविमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीnपंचायती राज समितीnरोजगार हमी योजना समितीnअनुसूचित जमाती कल्याण समिती

यातील या बहुतांश समित्यावर सत्ताधारी पक्षाचा आमदार अध्यक्ष असतो; मात्र अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीवर विरोधी पक्षाचा आमदार अध्यक्ष असतो.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतvidhan sabhaविधानसभाEknath Shindeएकनाथ शिंदे