शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेराने शिवीगाळ करून धमकाविल्याची महिलेची तक्रार, सलमानच्या ‘बॉडीगार्ड’वर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 04:38 IST

मुंबई : ‘दबंग’स्टार सलमान खान याचा मुख्य ‘बॉडीगार्ड’ गुरमीत सिंग उर्फ शेराने आपल्याला शिवीगाळ करून धमकाविल्याची तक्रार एका महिलेने शुक्रवारी खार पोलीस ठाण्यात केली आहे. ‘बिग बॉस-११’ मालिकेतून बाद झालेल्या स्पर्धक झुबेर खान याला, सलमान खानविरोधात तक्रार करण्यासाठी या महिलेने मदत करत असल्याचे सांगून, शेराने हे कृत्य करीत असल्याचे तिने ...

मुंबई : ‘दबंग’स्टार सलमान खान याचा मुख्य ‘बॉडीगार्ड’ गुरमीत सिंग उर्फ शेराने आपल्याला शिवीगाळ करून धमकाविल्याची तक्रार एका महिलेने शुक्रवारी खार पोलीस ठाण्यात केली आहे. ‘बिग बॉस-११’ मालिकेतून बाद झालेल्या स्पर्धक झुबेर खान याला, सलमान खानविरोधात तक्रार करण्यासाठी या महिलेने मदत करत असल्याचे सांगून, शेराने हे कृत्य करीत असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.वांद्रे येथे राहात असलेल्या शबनम अब्दुल हमीद शेख (३२) हिचा गारमेंटचा व्यवसाय असून, सीडब्लूसी इंटरप्राइझेस या सिक्युरिटी एजन्सीची ती प्रमुख आहे. बिग बॉस मालिकेतील स्पर्धक झुबेर खान याने सलमान विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शबनम शेख यांची मदत घेतली होती. त्यानंतर, ८ आॅक्टोबरनंतर त्यांना अनेक फोन येत आहेत. कोणी सलमानचा फॅन असल्याचे सांगून फोन करतो, तर कोणी शिवीगाळ करून धमकी देतो, अशी तक्रार त्यांनी दिली आहे.२० आॅक्टोबर रोजी त्यांना मोबाइलवर एक फोन आला. त्यांनी फोन घेतल्यानंतर, ‘आप भाई को क्यो तकलीफ दे रही हो, जो भी है आपस में सेटल करलो,’ असे सांगितले. तेव्हा ‘मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोण बोलताय,’ असे विचारल्यावर त्या व्यक्तीने सलमानचा बॉडीगार्ड शेरा सांगितले. शबनम यांनी त्याला कोणतीही सेटलमेंट करण्याची तयारी न दाखवता, एनडेमॉल, कलर्स आणि बिग बॉस विरोधात तक्रार करणार असल्याचे सांगितल्यानंतर, त्याने चिडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, तसेच दहा लोकांसमोर तुझ्यावर सामूहिक बलात्कार करू, असे धमकाविल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे शनिवारी केली.

टॅग्स :Crimeगुन्हा