शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

शेकडोने वाढ :गिधाडांचे नाशिकच्या आदिवासींकडून संवर्धन

By azhar.sheikh | Updated: August 9, 2017 20:56 IST

जगाच्या पाठीवरून अन्नसाखळीमधील महत्त्वाचा असलेला घटक गिधाड नामशेष होत असून संरक्षित पक्ष्यांच्या यादीमध्ये त्याचा समावेश होत आहे. गिधाड हा निसर्गाचा सफाईकामगार म्हणून ओळखला जातो.

ठळक मुद्देगिधाड नामशेष होत असून संरक्षित पक्ष्यांच्या यादीमध्ये त्याचा समावेश आदिवासी मागील सहा वर्षांपासून गिधाड संवर्धनासाठी झटत आहेनाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ह्यखोरीपाडा तीन वर्षांमध्ये गिधाडांची संख्या तीनशेपर्यंत

अझहर शेख / आॅनलाइन लोकमत, नाशिक : जगाच्या पाठीवरून अन्नसाखळीमधील महत्त्वाचा असलेला घटक गिधाड नामशेष होत असून संरक्षित पक्ष्यांच्या यादीमध्ये त्याचा समावेश होत आहे. गिधाड हा निसर्गाचा सफाईकामगार म्हणून ओळखला जातो. गिधाडच्या प्रजाती भारतातही धोक्यात आल्या आहेत; मात्र नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ह्यखोरीपाडा येथे आदिवासी मागील सहा वर्षांपासून गिधाड संवर्धनासाठी झटत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले असून दोन्ही प्रजातींच्या गिधाडांच्या संख्येत शेकडोने वाढ झाली आहे.गिधाड संवर्धन ही काळाची गरज ओळखून वनविभागाने येथील गावकºयांशी चर्चा करून तत्काळ संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत केली. गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी जागेची पाहणी करुन संरक्षक कुंपण तयार केले आणि त्याला ह्यगिधाड रेस्तरॉँह्ण असे नाव देण्यात आले. हा रेस्तरॉँ चालविण्याची संकल्पनाही अत्यंच आगळीवेगळी अधिकाºयांनी आणि गावकºयांनी शोधून काढली.सरकारी इच्छाशक्ती असेल आणि त्या इच्छाशक्तीनुसार केलेल्या प्रयत्नांना जर लोकसहभागाची जोड मिळाली, तर निसर्गाचे संवर्धन कशा पध्दतीने होऊ शकते, याचे मुर्तिमंत उदाहरण खोरीपाड्याला भेट दिल्यावर सहज पहावयास मिळते.पंचक्रोषिमध्ये आवाहन; रेस्तरॉँचा प्रचारपंचक्रोषित वनविभागच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांनी आणि संंयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैद्य शंकर शिंदे यांनी ह्य गिधाड उपहारगृह उपक्रमाची माहिती पोहचविण्यास सुरूवात केली. पंचक्रोषित कुठेही काही आजाराने अथवा अपघाताने जनावर दगावल्यास त्याचा मृतदेह जमिनित न पुरता त्याची माहिती तत्काळ वनविभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला खोरीपाडा, चिंचवड, हरसूल, वाघेरा, नाकेपाडा या पंचक्रोषिमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मृत जनावरांचे मृतदेह येथील रेस्तरॉँमध्ये वैद्यकिय तपासणी करुन आणून टाकले जाऊ लागले.

वनविभाग व अदिवासी आशावादीप्रारंभी वर्षभर या प्रकल्पाकडे गिधाडे अगदी बोटावर मोजण्याइतकेच आली; मात्र प्रयत्नाला काही प्रमाणात यश मिळाल्याचे बघून वनविभाग व गावकरी आशावादी होते. त्यांनी ह्य रेस्तरॉ सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न कमी पडू दिले नाही. पंचक्रोषित कुठेही जनावर दगावले तर ते जनावर रेस्तरॉँ पर्यंत आणून गिधाडांना खाद्य उपलब्ध करुन दिले. त्यामुळे गिधाडांना रेस्तरॉँ चांगलाच भावला हळहळू गिधाडे येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आले. तीन वर्षांमध्ये गिधाडांची संख्या तीनशेपर्यंत पोहचल्याने प्रकल्पाला यश आल्याने समाधान व्यक्त केले गेले.

दोन्ही प्रजातींची शेकडो गिधाडेसहा वर्षांमध्ये गिधाडांची संख्या जवळपास चारशेच्या पुढे गेली आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन्ही प्रजातींच्या गिधाडांचा समावेश आहे. पांढºया पाठीची आणि लांब चोचीची अशा दोन्ही प्रजातीची शेकडो गिधाडे ह्यरेस्तरॉँह्णवर भूक भागविण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात. वनविभागाकडून या गिधाड रेस्तरॉँची वेळोवेळी देखभाल दुरूस्ती करण्यावर भर दिला आहे. गिधाडांच्या उपहारगृहात मोकाट कुत्र्यांचा शिरकाव रोखण्यासाठी वनविभागाकडून संरक्षक जाळ्यांची उंची देखील वाढविण्याचा विचार केला जात आहे.