शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ ठरली खरी ‘मर्दानी’, मद्यपीच्या तावडीतून केली कंडक्टरची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 04:29 IST

रात्री अकराची वेळ. प्रवाशांना घेण्यासाठी बसथांब्यावर बस थांबवली. त्याच दरम्यान एका मद्यपीने बसच्या काचेवर मारले. म्हणून त्याला कंडक्टरने हटकले. याच रागात मद्यपीने कंडक्टरलाच लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. बघ्यांची गर्दी जमली. मात्र, मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.

मुंबई - रात्री अकराची वेळ. प्रवाशांना घेण्यासाठी बसथांब्यावर बस थांबवली. त्याच दरम्यान एका मद्यपीने बसच्या काचेवर मारले. म्हणून त्याला कंडक्टरने हटकले. याच रागात मद्यपीने कंडक्टरलाच लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. बघ्यांची गर्दी जमली. मात्र, मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. तेथून रिक्षाने जात असलेल्या महिलेने हा प्रकार पाहिला आणि रिक्षा थांबवून ती खाली उतरली. धाडसाने तिने मद्यपीला रोखले. त्याला चांगलाच चोप देत, त्याच्या तावडीतून तिने कंडक्टरची सुटका केल्याची घटना भांडुपमध्ये घडली.नवी मुंबईतील रहिवासी असलेले प्रवीण मोकाशी (३२) हे बेस्टमध्ये कंडक्टर आहेत. १२ एप्रिल रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास ते मुलुंड बेस्ट डेपोतून कर्तव्यावर निघाले. रात्री ११ च्या सुमारास त्यांची बस सोनापूर स्मशानभूमी बसथांब्यावर थांबली. त्याच दरम्यान, कोणीतरी बसच्या मागील काचेवर मारल्याचा आवाज आल्याने मोकाशी खाली उतरले. तेव्हा एका तरुणाने बसच्या पुढच्या काचेवर मारल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मोकाशी त्यांच्याकडे जाईपर्यंत तरुण तेथून निघून गेला. मात्र, मोकाशी यांनी त्याच्या साथीदाराला पकडले. त्याला घेऊन ते पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले. पुढे काही अंतरावर गेल्यानंतर एका मद्यपीने बस अडवली. बसमध्ये चढून ‘खिंडीपाड्यांचा भाई आहे,’ असे म्हणत त्याने मोकाशी यांना मारहाण सुरू केली. त्या वेळी बसमध्ये ३ प्रवासी होते. त्याने मोकाशीला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. बघ्यांची गर्दी जमली. त्याच दरम्यान तेथून रिक्षातून जाणारी एक महिला रिक्षा थांबवून पुढे आली. तिने कसलीही भीती न बाळगता, त्या मद्यपीला अडविले. त्याने तिच्यासोबत असभ्य वर्तन करायला सुरुवात केली. तेव्हा तिने त्याला चोप देण्यास सुरुवात केली. या मर्दानीचे धाडस पाहून बघ्यांनीही पुढे येत त्याला चांगलाच चोप दिला. तोपर्यंत महिला तेथून निघून गेली. तिच्या या धाडसाचे सर्वांकडूनच कौतुक होत आहे.जखमी झालेल्या मोकाशी यांना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी मद्यपीविरुद्ध गुन्हादाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.अशी माणसे कमी पाहायला मिळतातबघ्यांच्या गर्दीत एका महिलेने मदतीसाठी पुढाकार घेतला. तिच्या धाडसाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यांचे नावही समजू शकले नाही. अशी दुसऱ्यांसाठी धावून येणारी माणसे फार कमी पाहायला मिळतात, असे मोकाशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.ती महिला कोण?सध्या या महिलेच्या धाडसाची सर्वत्र चर्चा आहे. मात्र, ती महिला कोण होती, कुठे राहणारी आहे, हेमात्र अद्याप समजू शकलेले नाही. 

टॅग्स :WomenमहिलाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र