शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
2
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
4
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
5
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
6
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
7
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
8
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
9
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
10
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
11
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
12
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
13
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
14
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
15
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
16
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
17
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
18
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
19
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
20
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
Daily Top 2Weekly Top 5

जखमी अवस्थेतही तिने दिली चोरट्यांशी झुंज

By admin | Updated: June 28, 2015 10:53 IST

भरधाव दुचाकीवरील चोरट्यांनी तिची सोनसाखळी खेचली. मात्र, तिनेही तेवढ्याच धैर्याने त्यांचा टी शर्ट पकडला. त्याही अवस्थेत त्यांनी गाडी पळविण्याचा प्रयत्न केला.

ठाणे : भरधाव दुचाकीवरील चोरट्यांनी तिची सोनसाखळी खेचली. मात्र, तिनेही तेवढ्याच धैर्याने त्यांचा टी शर्ट पकडला. त्याही अवस्थेत त्यांनी गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत ती फरफटत गेली, पण टी शर्ट सोडला नाही. अखेर जमावाने चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.कोणत्याही सिनेमामध्ये शोभावे,असा हा प्रकार शनिवारी दुपारी ठाण्यात घडला. कळवा, खारीगाव येथे राहणाऱ्या मंदा दिलीप शेटे (४९) या गणेश टॉकिज येथे सिनेमाची तिकिटे काढण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, ती न मिळाल्यामुळे त्या चालत सिव्हिल रूग्णालयाच्या दिशेने येत असताना झेंडेवाला दर्गाह येथे दुचाकीवरु न आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. त्या वेळी प्रसंगावधान राखून दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याचे टी शर्ट त्यांनी पकडले. मात्र, या चोरट्यांनीही त्याच अवस्थेत गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या गाडीबरोबर ओढल्या गेल्या मात्र, त्यांनी शेटे यांनी चोरट्याचा टी शर्ट सोडला नाही. अखेर त्यांच्या प्रतिकारामुळे तो चोरटा खाली पडला. त्यावेळी जमा झालेल्या जमावाने त्याला चांगलाच चोप देऊ पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शफी अख्तर जाफरी (१९) याला अटक केली आहे. मंगळसूत्र चोरीच्या चार घटना १सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पदाफार्श करणाऱ्या ठाणे पोलिसांना चोरट्यांनी आठवडाभराच्या आत पुन्हा आव्हान दिले आहे. शुक्रवारी एकाच दिवशीच पुन्हा मंगळसुत्र चोरीच्या चार घटना घडल्या आहेत. कापूरबावडी, नौपाडा आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनांमध्ये लाखोंचा ऐवज चोरीला गेला आहे. या चारही घटनांमध्ये वृद्ध महिलांना टार्गेट करण्यात आले असून एका चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ढोकाळी हायलॅन्ड रेसिडेन्सी येथे राहणारी ५६ वर्षीय महिला यशस्वीनगर येथून पायी जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरुन नेले. २या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. दुसऱ्या घटनेत कृष्णा सोसायटी वागळे इस्टेट भागात राहणारी २९ वर्षीय महिला कापूरबावडी भागात कामानिमित्त आल्या होत्या. धर्मवीरनगर रोडवरुन पायी चालत असतांना दुचाकीवरुन आलेल्या राजेश दुबरीया आणि कल्पेश परमार या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ७२ हजार रुपये किमंतीचे मंगळसूत्र व २८ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, असा एकूण एक लाख रुपये किमतींचा ऐवज घेऊन पोबारा केला. परंतु, त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तिसऱ्या घटनेत पाचपाखाडी भागात जीम जवळून पायी जात असलेल्या ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चोरून नेल्याची घटना २६ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली आहे. ३या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुचाकीवरुन आलेले हे दोघे तरुण अंदाजे २० ते २७ वयोगटातील होते अशी माहिती समोर आली आहे. चवथ्या घटनेत वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५१ वर्षीय महिला आपल्या घरच्यांसमवेत खाजगी रुग्णालयातून उपचार घेऊन जात असतांना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख २५ हजार रुपये किमंतीचे मंगळसूत्र चोरले आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.